Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय भजन प्रशिक्षण शिबिर

Share

सातपूर । प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागातर्फे कामगार व कामगार कुटुंबियांसाठी चार दिवसीय राज्यस्तरीय भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्र.सहाय्यक कल्याण आयुक्त सयाजी पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे प्र कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.२६) ते गुरूवार (दि.२९ ) ऑगस्ट दरम्यान सातपूर कॉलनी येथील कामगार कल्याण भवनमध्येे १५ व्या राज्यस्तरीय भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. जगद‍्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर आणि निमा अध्यक्ष तथा नगरसेवक शशिकांत जाधव हे राहणार आहेत.

शिबिरात दररोज दीड तासांचे चार सत्र होणार असून एकूण १६ वक्ते भजन, कीर्तन व त्यासाठी वापरण्यात येणारे वाद्य याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी सुमारे १२५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

या शिबिराचा जास्तीत जास्त कामगार व कामगार कुटुबियांनी तसेच सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिर संचालक नीलेश गाढवे, सातपूर कल्याण निरीक्षक अजय निकम, केंद्र संचालक राजेंद्र नांद्रे यांनी केले आहे.

शिबिरातील वक्ते आणि विषय

सोमवारी (दि. २६) – ह.भ.प. जगद‍्गुरू डॉ. रामकृष्ण लहवितकर (महाराष्ट्राची लोकसंस्कृती व भजन कीर्तनाचे मुल्य), आनंद अत्रे (भजनात संवादिनीचे महत्त्व, कौशल्य), ह.भ.प.बाळासाहेब महाराज गतीर (लावूनी मृदुंग श्रृती टाळ घोष), कवी रवींद्र मालुंजकर (भजन सादरीकरण तंत्र आणि मंत्र)

मंगळवारी (दि. २७ ) – ह.भ.प. माधवदास महाराज राठी (तुका म्हणे येेथे भजन प्रमाण), डॉ. आशिष रानडे (गायनातून अभंगाचे स्वरुप), नीलेश गाढवे (भजनात मृदुंगाचे महत्त्व व प्रत्यक्ष वादन), ह.भ.प. शिवराम महाराज बोराडे (सांप्रदायिक भजन : गौळण व भाव)

बुधवारी (दि. २८ ) – ह.भ.प. गजेंद्र महाराज राजपूत (भजनाकडून- समाधिकडे, भजनाकडून प्रबोधनाकडे), ह.भ.प. चैतन्य महाराज पैठणकर (वारकरी भजनाचा उगम व विकास), ह.भ.प. रमेश महाराज खाडे (भजन आणि भक्ती), ह.भ.प. शिवा महाराज आडके (कीर्तनात भजनाचे महत्त्व)

गुरूवारी (दि.२९ ) – ह.भ.प. स्वामी कंठानंद (भजन आणि ज्ञान विज्ञान), ह.भ.प. शिवलिंग स्वामी महाराज (तुकोबारायांची अभंगवाणी व भजन), ह.भ.प. किशोर महाराज खरात (भजन आणि सुखप्राप्ती), पं. शंकरराव वैरागकर (भजन व भैरवी) यावर शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!