Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर ‘उत्कृष्ट पोलीस ठाणे’

Share

इंदिरानगर। वार्ताहर

सोन साखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला ‘उत्कृष्ट पोलीस ठाणे’ द्वितीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्र पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता (दि.८ ऑगस्ट) रोजी पाथर्डी फाटा येथे राहणारे महिला शोभा तुकाराम गोवर्धने (वय ३२ )मुलाला घरी घेऊन जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याची पोत बळजबरीने ओढून नेली होती.

याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अंकूश दांडगे व त्यांचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी करत होते त्याआधारे संशयित आरोपी येण्या-जाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दांडगे यांनी आपले कौशल्य वापरून गुप्त बातमीदार मार्फत संशयित आरोपींना गजाआड केले होते व त्यांच्याकडून ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

याची दखल घेत पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण ,गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अंकूश दांडगे, भगवान शिंदे, दत्तात्रय गवारे, राजेश निकम, रियाज शेख, अखलाख शेख, राजू राऊत यांना पोलीस आयुक्तालयात सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख आदी अधिकारी उपस्थित होते.

दांडगे यांना प्रशंसापत्र
गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अंकूश दांडगे याना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विश्‍वास नागरे पाटील यांच्याहस्ते ‘प्रशंसा पत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!