Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकात धावणार ‘निर्माल्य रथ’

Share

नवीन नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिका हद्दीतील सर्व धार्मिक स्थळांवर निर्माण होणारे निर्माल्य यांचे सकलन व विल्हेवाट लावण्याची विशष व्यवस्था आजमितिस उपलब्ध नाही. नाशिक शहर हे अत्यंत धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर आहेत. अनेक धार्मिक स्थळाना पुरातन काळापासून महत्व आहे.

याठिकाणी अनेक भाविक भक्तिभावाने फूले, हार, विविध प्रकारचे नैवद्य, प्रसाद अर्पण करत असतात. मात्र नंतरचे ते निर्माल्य संकलन व विघटन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था महापालिके कड़े नाही. काही भाविक ते निर्माल्य नदीपात्रात टाकतात त्यामुळे नदीचे प्रदूषण देखील होते. यामुळे भविकांच्या भावनांना ठेच पोहचते.

हीच बाब शिवसेना नगरसेविका रत्नमाला राणे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ‘निर्माल्य रथ’ तयार करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. कालच्या महासभेत त्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असुन सहाही विभागात वेगवेगळे निर्माल्य रथ सुरु करण्याचा मनोदय आरोग्य अधिकारी व नगरसेविका रत्नमाला राणे यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!