Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वाहनचालकांसाठी ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’

Share

नाशिक । प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात ‘वन स्टेट वन इ-चालान’ अभियान राबवण्यात आले आहे. याअंतर्गत ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’देखील विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाहनचालक कोणत्याही शहरातून दंडाची रक्कम थेट ऑनलाईन अदा करू शकतो. हे अ‍ॅप डाऊनलोड करून लाभ घेण्याचे आवाहन नाशिक वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाट्रॅफिक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वाहनचालक ऑनलाईन पद्धतीने दंड भरू शकतील. बेशिस्त चालकांना शिस्त लागावी, त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून अनेकदा वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होतात. ते टाळण्यासाठी पोलिसांनी इ-चालान पद्धत अवलंबली आहे.

त्यानुसार बेशिस्त चालकांनी जे वाहतूक नियम मोडले असतील त्याचा उल्लेख करून संबंधितांना दंडाची पावती घरी पाठवली जाते. मात्र अनेकदा पत्ता बदलल्याने किंवा चालकांनी दुर्लक्ष केल्याने दंड भरला जात नाही. त्यामुळे ही त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्रासाठी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामार्फत वाहनचालकास नियम मोडल्यास किती दंड आकारला आहे याची माहिती मिळेल तसेच दंडाची रक्‍कम ऑनलाईन पद्धतीनेही भरता येणे शक्य झाले आहे.

वादविवादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हायटेक होत स्मार्ट पर्याय शोधला असून ‘इ-चालान’ पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार बेशिस्त वाहनचालकांनी ज्या वाहतूक नियमाचे उल्लंघन केले असेल त्याचा उल्लेख करून त्या वाहनचालकाला मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेची पावती थेट घरपोच पाठवली जाते. मात्र अनेकदा वाहनाचालकांच्या पत्त्यांमधील त्रुटींमुळे किंवा वाहनचालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे दंडाची रक्कम भरली जात नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलीस प्रशासनाने त्याच्यापुढे एक पाऊल टाकले आहे.

याबाबत बोलताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुल म्हणाल्या, वन इ-चालानप्रमाणे वन अ‍ॅप राज्यस्तरावर विकसित करण्यात आले आहे. ‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करून थेट ऑनलाईन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येणे सोपे होणार आहे. त्यामुळे चालकांची आणि पोलिसांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!