Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘दूरशिक्षण’चे प्रवेश सुरू होणार

Share
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : पुनर्मूल्यांकनासाठी शुल्कवाढ करण्याचा निर्णय ; Savitribai Phule Pune University : Decision to raise fee for re-evaluation

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत सुरू होणार्‍या डिस्टन्स एज्युकेशन अभ्यासक्रमांचे (दूरशिक्षण) प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर मुक्त अध्ययन प्रशालेच्या वेब पोर्टलची लिंक २७ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे.

या वेब पोर्टलवर दूरशिक्षण अभ्यासक्रमाबाबत प्रवेश, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी मदत, सूचना आदी सुविधांसाठीचे http://www.unipune.ac.in/sol   हे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. हे पोर्टल सध्या उघडून पाहता येईल. मात्र त्याद्वारे प्रवेश घेण्यासाठी त्याची लिंक २७ ऑगस्ट २०१९ पासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रशालेअंतर्गत नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच दुरस्थ शिक्षणातील अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत.

वार्षिक परीक्षा पद्धत श्रेयांकानुसार मूल्यमापन पद्धत राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, पुणे व नगर या तीन जिल्ह्यांत अभ्यास केंद्रांची व परीक्षा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिन्ही जिल्ह्यांमधील अभ्यास केंद्रांवर शनिवार व रविवार तसेच इतर सुटीच्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयानुसार सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

दूरशिक्षण व्यवस्थेद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व उत्तम दर्जाच्या मार्गदर्शनाद्वारे पदवी व पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्याचा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!