Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘नासाका’ सुरू व्हावा : शेतकरी, कामगारांची मागणी

Share

 

दे. कॅम्प । वार्ताहर

बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी नासाका बचाव कृती समिती व कामगार युनियनच्या वतीने एकमुखी ठराव करण्यात आला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे येथील एस.एस.बी.एम. इंडिया शुगर इंडस्ट्रीज यांच्या प्रयत्नातून यंदा गाळप हंगामासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखाना सुरू व्हावा, ही शेतकरी, कामगार व परिसरातील सर्व व्यावसायिकांनी अपेक्षा असून या पार्श्‍वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे होते. मयत कामगारांना श्रद्धांजली वाहून मेळाव्यास प्रारंभ झाला. यावेळी गायखे यांनी सुप्रीम कोर्टात जमा असलेल्या रकमेतून कामगारांचे भविष्य निर्वाह निधीसह सोसायटीची रक्कम देण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेने मान्य केले असल्याचे सांगितले. या माहितीचे कामगारांनी स्वागत केले.

यावेळी पंडित सोनवणे, सुभाष हुळहुळे, बबनराव कांगणे , चंद्रभान कोंबडे, ज्ञानेश्वर गायधनी, गणपत कानडे, रूंजा फोकणे यांनी मनोगत व्यक्त करताना चार तालुक्यांच्या विकासाचे व हजारो कामगार, शेतकर्‍यांच्या अस्मितेचे केंद्र सुरू राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.

सर्व घटकांनी घेतलेल्या निर्णयाचे बचाव कृती समिती अध्यक्ष विलास गायधनी यांनी स्वागत केले. यावेळी श्रीकांत गायधनी, सोमनाथ रोकडे, अविनाश गायधनी, सुदाम आडके, रंगनाथ बर्‍हे, बबन ढेरिंगे, तुषार गायधनी, नामदेव बोराडे, शंकर रोकडे, शरद पगार, सुरेश दळवी, प्रकाश गोसावी, नंदु बरकले, शिवाजी गायधनी, मधुकर मुठाळ, दिनकर गायधनी, नामदेव सहाणे, विष्णुपंत आडके, विजय शिंदे आदींसह कामगार व शेतकरी उपस्थित होते. आभार भाऊसाहेब आडके यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!