Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

कचर्‍याचा वाद थेट पोलीस ठाण्यात; आनंदनगरच्या ड्रीम सोसायटीतील प्रकार

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

ओला व सुक्या कचर्‍याचे विलगीकरण करून तो संकलीत करण्यासाठी महापालिकेने विशिष्ट यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र गेल्या आठवड्यातील धुव्वाधार पावसामुळे अनेक रहिवासी सोसायट्यांत पाणी शिरले व त्यासोबत कचरा वाहून आला. यातील ओला व सुका कचरा विलग करूनच तो उचलला जाणार, अशी भूमिका मनपा कर्मचार्‍यांनी घेतल्याने हा वाद थेट पोलीस ठाण्यात गेला.

आनंद नगर येथील ड्रीम सोसायटीत कमरेइतके पाणी झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला होता. मात्र हा कचरा काढण्यावरून मनपा कर्मचारी व सोसायटीतील रहिवासीयांचा वाद विकोपाला गेला. वाद मिटता मिटेना त्यामुळे हा प्रकार थेट पोलीस ठाण्यात गेल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाली.

पावसाने उघडीप घेतल्यानंतर मनपा कर्मचारी हा कचरा काढण्यासाठी आले व त्यांनी ओला व सुका कचरा विलग करून देण्याची मागणी केली. मात्र हे काम तुमचे असून आम्ही कसे करणार अशी भूमिका रहिवासीयांनी घेतली. परंतु मनपा कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते व त्यांनी थेट प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचे फर्मान सोडले. दंड भरण्यास कोणी तयार नसल्याने मनपा कर्मचार्‍यांनी थेट उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सोसायटी रहिवासीयां विरोधात तक्रार केली.

उपनगर पोलीस सदर सोसायटीत आल्यानंतर त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवासीयांनी दंड कसा भरायचा, असा सवाल केला असता पोलीससुद्धा हतबल झाले. त्यानंतर रहिवासी सतीश गवळी व इतरांनी नगरसेविका ज्योती खोले, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख शाम खोले यांच्याकडे तक्रार केली.

त्यांनी मनपा कर्मचार्‍यांना विचारणा केली. मात्र कर्मचार्‍यांनीही त्यांना दाद दिली नाही. या प्रकारामुळे रहिवासी मनपा कर्मचार्‍यांच्या हटवादी भूमिकेने त्रस्त झाले. या प्रकरणी लवकरच खोले दाम्पत्यांच्या नेतृत्वाखाली मनपा अधिकार्‍यांची भेट घेऊन जाब विचारणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!