Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

पंतप्रधानांच्या हस्ते ‘यज्ञ’ पुस्तकाचे प्रकाशन

Share

नाशिक । प्रतिनिधी

शालेय स्तरावर योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जागतिक विश्वविक्रम विजेत्या प्रज्ञा पाटील यांनी लिहिलेल्या ‘यज्ञ’ या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय पाटील यांच्या उपक्रमाला पीएमओ कार्यालयाशी जोडण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सातपूर येथील योगा कल्चर असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना अध्यक्ष डॉ.यु.के. शर्मा यांनी सांगितले की, नाशिक मधील योगिनी प्रज्ञा पाटील यांनी दि .२० जून २०१८ रोजी सलग १०३ तास योग करुन जागतिक विक्रम केला आहे.

त्यानंतर पाटील यांनी योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य योग प्रशिक्षण दिले जात आहे. ४० महाविद्यालयचे विद्यार्थी आणि २५० जेष्ठ नागरिकांच्या सहभागातून ६४०० विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आता या प्रशिक्षणासाठी प्रज्ञा पाटील यांनी खास अभ्यासक्रम तयार केला असून, त्या अभ्यासक्रमाचे ‘यज्ञ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.प्रकाशन समारंभास खा. हेमंत गोडसे, खा.भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, माजी मंत्री बबन घोलप आणि सावानाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत प्रज्ञा पाटील, प्रा.वंदना रकीबे, सुभाष वाणी, सुनीता वाणी,अशोक पाटील, रामनाथ गंभीरे, जया पाटील आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!