साडे नऊ लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त

आतंरराष्ट्रीय विमानतळावर कर चुकवून विक्री

0

नाशिक|प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर चुकवून महागड्या स्कॉच आणून शहरातील प्रतिष्ठित, उच्चभ्रु व्यक्तींना विक्री करणारर्‍या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ ने जेरबंद केले आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कर चुकवून आणलेला दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. संशयितांकडून ९ लाख ५० हजार रुपयांची स्कॉच आणि १ चारचाकी व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

नरेश पेरुमल नागपाल आणि किरपाल फत्तेचंद नागपाल (दोघे रा. देवळाली कॅम्प) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक, अरुण सुत्रावे, जवान विरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुवर, विष्णू सानप आदींच्या भरारी पथकाने द्वारका परिसरातून नरेश नागपाल यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडील झडतीत केवळ परदेशात विक्रीसाठी मान्यता असलेल्या महागड्या स्कॉचचा साठा आढळून आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर किरपाल नागपाल याच्याकडून त्याने हा साठा खरेदी केल्याचे उघडकीस आले.

त्यानुसार पथकाने किरपाल याच्या घरात आणि वाहनांची पाहणी केली असता १ लिटर क्षमतेच्या ११० नामांकित स्कॉच आढळून आल्या. या स्कॉचची किंमत ९ लाख ५० हजार रुपये आहे. दोघांच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कर चुकवून स्कॉचचा साठा शहरात आणला जात असल्याचे समोर आले आहे.

हा साठा शहरातील उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित लोकांना कमी किंमतीत विक्री केला जात होता. त्यामुळे शासनाचा महसुल बुडत आहेे. त्याचीे उत्पादन शुल्क विभागामार्फत शहानिशा सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

*