Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

संवाद मतदारांशी : मतदारसंघावरील आरक्षण हटणार कधी?

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्‍वभुमीवर ‘दैनिक देशदूत’ प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील समस्या व लोकप्रतिनिधी कसा असावा? याबाबत आढावा घेत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतीच देवळाली विधानसभा मतदारसंघात देशदूतचे प्रतिनिधी पोहोचले. देवळाली विधानसभा मतदारसंघात ६४ खेडे, भगुर नगरपरिषद, देवळाली कॅन्टोंमेंट बोर्ड आणि नाशिक महापालिकेचे दोन प्रभाग समाविष्ट आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, लहान-मोठे व्यापारी, युवक यांच्याशी संवाद साधत त्याचे गार्‍हाणे ऐकून घेण्यात आले.

लोकप्रतिनिधीचा जनतेशी संपर्क असावा, नागरिकांची गैरसोय दूर करावी. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न लोकप्रतिनिधीने सोडवावेत. जनतेचे प्रश्‍न मांडणारा लोकप्रतिनिधी हवा.
दादासाहेब देशमूख, ज्येष्ठ नागरीक

मतदारसंघात भेडसावणार्‍या समस्या अनेक आहेत. त्यातील अधिक महत्त्वाची म्हणजे गेल्या काही वर्षांपुर्वी नागपै समिती स्थापन झाल्यानंतर हा मतदारसंघ २५ वर्षांसाठी राखीव करण्यात आला होता. मात्र, २५ वर्षे उलटूनही हा मतदारसंघ आरक्षीतच आहे. यावर कुणी बोलत नाही.
भिमराव चव्हाण, ज्येष्ठ नागरीक

साठ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला घर मिळायला हवे, तीन हजार रुपये पेन्शन मिळावी. मुलं सांभाळत नसतील तर त्यांच्या उत्पन्नतला १० टक्के हिस्सा मिळावा. घराणेशाही नसावी. जिथे घराणेशाही आली तिथे विकास खुंटतो हा अनुभव आहे.
श्रीराम कातकाडे, नागरीक

सहा वर्षांपासून नाशिक कारखाना बंद आहे. यामुळे रोजगार गेला परिणामी प्रगती खुंटली. खासदार, आमदार हे याच गावातले आहेत. त्यांनी कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
शेतकरी, विंचूर दळवी

विकास पाहिजे, पर्याय नाही. बेरोजगारी हटविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. रोजगार मिळाला तर विकास होईल, गुन्हेगारी आटोकयात राहिल.
काशिनाथ उबाळे, भगूर

लोकप्रतिनिधी सुशिक्षीत असावा, जनतेच्या सोबत त्याने पायाभूत सुविधांसाठी पुढे आले पाहिजे. लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारमुक्त असावा. त्याचा कारभार पारदर्शक असावा.
रहिवासी , भगूर

विधानसभा सदस्य जनतेचा मित्र असावा. जनतेच्या समस्या सोडविणारा असावा. नियमित त्याने मतदारसंघात फेरफटका मारावा. जनतेशी संवाद साधून प्रश्‍न सोडवले पाहिजेत. असाच लोकप्रतिनिधी आम्हाला हवा आहे.
रहिवासी , भगूर

लोकप्रतिनिधीने मतदारसंघात भेटी दिल्य पाहिजे. सोयीसुविधा बघायला पाहिजेत. देवळाली कॅम्पमधील मार्केटचा, पार्किंगचा विषय ऐरणीवर आहे. दूर वाहने पार्किंग करावी लागतात. विकास तर होतो आहे, यात भर पाडणारा उमेदवार हवा आहे.
सुरेश कुचाळकर, व्यापारी असो.अध्यक्ष

प्रश्‍न तसे बरेच आहेत, महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे देवळाली परिसरातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लेव्हीट मार्केटचा प्रश्‍न 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. तो मार्गी लावावा. येथील पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
गौतम गजरे, व्यापारी,देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प मतदारसंघात भिुमगत गटारींसाठी रस्ते खोदले आहेत. लॅमरोड परिसरात मोठ्या समस्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधीने लक्ष दिले पाहिजे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर केली पाहिजे.
अरविंद ताजने व्यापारी ,देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसरात प्रत्येक जातीधर्माचे लोक राहतात. आम्हाला गोरगरीब जनतेच्या पाठिमागे उभा राहणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. नेता कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्हाला चालेल. त्याने आमचे प्रश्‍न मांडले पाहिजेत.
सादीकभाई कॉन्ट्रॅक्टर, व्यापारी, देवळाली कॅम्प

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!