Type to search

Featured नाशिक

राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे स्मरण

Share

नाशिक | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र तपासणी सुरू असून, या तपासणी दरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून मशिनची खातरजमा करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याने आता निवडणूक शाखेच्या वतीने या पक्षांना स्मरणपत्र देवून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदान यत्रे मॅनेज केले जात असल्याचा शंखनाद राजकीय पक्षांकडून केला जातो. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवरच घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, आयोगाने त्यास स्पष्ट नकार दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जिल्ह्याला मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. यात ९४२२ बॅलेट युनिट, ५४७९ कंट्रोल युनिट प्राप्त झाले असून, अंबड वेअर हाउस येथे ही यंत्रे ठेवण्यात आली आहेे. आयोगाकडून आलेल्या २० अभियंत्यांमार्फत ही यंत्रे तपासणी करण्यात येत आहे.

हे यंत्र नेमके कसे काम करते. त्यामध्ये काय करता येऊ शकते काय करता येऊ शकत नाही, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. इतकेच नव्हे; तर ही यंत्र हाताळण्याची व शंकांचे निरसन करवून घेण्याची संधीही राजकीय पक्षांना मिळणार आहे.

मात्र, शिवसेना वगळता एकही राजकीय पक्षांकडून या तपासणी मोहिमेकरिता प्रतिनिधी हजर राहत नसल्याने निवडणूक शाखेच्या वतीने पुन्हा एकदा राजकीय पक्षांना स्मरण करून देत या तपासणीदरम्यान उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!