Type to search

Featured नाशिक

यमाच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांमध्ये जागृती

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

पंचक येथील जनता विद्यालयात मिलिंद पगारे यांनी विद्यार्थ्यांना यमाच्या पोशाखात वाहतूक सुरक्षा आणि प्लॅस्टिकमुक्ती, इंधनमुक्त प्रवास या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकमुक्तीची शपथ देण्यात आली.

सेवानिवृत्त अधिकारी पगारे यांनी विद्यार्थ्यांना हेल्मेट आणि सायकल वापराचे महत्त्व, वाहतूक सुरक्षेचे नियम, प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम याची माहिती दिली. ते म्हणाले, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अप्रत्यक्षरीत्या प्लॅस्टिकचा वापर आपण करीत असतो. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

दुधाच्या पिशवीपासून ते दाताच्या ब्रशपर्यंतच्या वापरामुळे प्लॅस्टिक आपल्या शरीरात मिसळते. त्यामुळे नवनवीन आजारांना आमंत्रण मिळत आहे. वंध्यत्व निवारण केंद्रे ही प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे निर्माण झाली आहेत. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर प्लॅस्टिकपासून लांब राहावे. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका.

कारमध्ये सीटबेल्ट वापरा. त्यांनी यमराजाचा पोशाख घालून विद्यार्थ्यांना आकर्षित केले. तुमचा फोन मलाही येऊ शकतो असे सांगत पगारे रस्त्यावर वाहनचालकांना मोबाईल वापरू नका, अशी जनजागृती करीत आहेत.

यावेळी मुख्याध्यापिका अनिता घोलप, एस. ए. ढोकरे, सोमनाथ सहाणे, ए. पी. कासार, एम. एस. कांडेकर, सोमनाथ सहाणे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!