Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

लाखोच्या वीजबिलाने मोडले कंबरडे!

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

भगूरलगतच्या विंचुरी दळवी परिसरातील वाड्या-वस्तीवरील शेतकर्‍यांना वीज वितरण कंपनीकडून लाखोची बिले देऊन छळवणूक केली जात असून त्यात तातडीने सुधारणा करा अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र क्रांती सेनेने दिला आहे.

विंचुरी दळवी परिसरातील शेतकर्‍यांनी पांढुर्ली येथील सहायक अभियंता विजय सोनवणे यांची भेट घेऊन संपूर्ण परिसरातील गाव व खेड्यांमध्ये वीज ग्राहकांना गेल्या सहा महिन्यांपासून वाढीव वीजबिले देऊन छळवणूक केली जात आहे. येथील गोरख शेटे यांना फेब्रुवारी महिन्याचे बिल 320 रुपये असताना जुलै महिन्यात ते 1 लाख 5 हजार 750 रुपये एवढे आकारण्यात आले.

याशिवाय मीटर खराब आहे या कारणास्तव वीज वितरण कंपनी सेवकांनी शेटे यांच्याकडून 10 हजार रुपये वसूल केले. मात्र त्याची कोणतीही पावती दिली नाही. याशिवाय ग्राहकांना वाढीव बिले देणे, वारंवार मीटर बदलण्यास सांगणे, धमकावणे, कनेक्शन तोडणे असे प्रकार होत आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांचे कर्ज व वीजबिल माफीचा फतवा काढला असताना वीज वितरण कंपनीचे सेवक मात्र जनतेची पिळवणूक करत आहेत.

शेतकर्‍यांना वेठीस धरून लुबाडणूक करणार्‍या सेवकांनी ही पिळवणूक थांबवावी, चोवीस तास वीज देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, हे प्रश्‍न मार्गी न लागल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष गोपाळ गायकर, कैलास दातीर, चंद्रकांत डावरे, संजय तुपे, दामू आडके गणेश शेळके, बाळू दळवी, भारत वाकचौरे, बाळू बर्वे, महंमद अन्सारी, सुनीता हिवाळे, बाळू शेटे आदींनी दिला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!