Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद महत्वपूर्ण – आमदार डॉ. राहुल आहेर

Share

देवळा | प्रतिनिधी

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंच संसद ही मैलाचा दगड ठरणार असून सरपंचांनी आपल्या कार्यकाळात पिढ्यानपिढया नाव निघेल असे काम करावे असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. देवळा येथे आयोजित चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ सरपंच संसदेत ते बोलत होते.

यावेळी महिला सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.देवळा येथील तुळजाई लॉन्सवर महाराष्ट्र सरपंच संसद व चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्यांचे एक दिवसीय अधिवेशन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते.

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील, प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले, नासिक विभाग समन्वयक डॉ. नामदेव गुंजाळ, आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील, ग्रामविकास तज्ञ प्रा. अनिकेत काळे, युवा मित्रचे संस्थापक सुनिल पोटे, बाजीराव खैरणार, आदर्श गाव गोहरणचे सरपंच अ‍‍ॅ‍ॅड. पवनकुमार जाधव, अविनाश आव्हाड,एमआयटी स्कुलचे प्राध्यापक महेश साणे , सरपंच संसदेचे राज्य समन्वयक योगेश पाटील, सहसन्वयक प्रकाश महाले,सरपंच गंगाधर निखाडे, सरपंच सोनाली देवरे, देवळा तालुका समन्वयक विजय पगार,चांदवड तालुका समन्वयक विजय जाधव,आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देवळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष विजय पगार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे यांनी ग्रामपंचायतीत काम करतांना शासनस्तरावर व गावपातळीवर येणाऱ्या समस्या मांडल्या.

सक्षम लोकप्रतिनिधी, सर्वांगीण ग्रामविकास, ग्रामविकासाचा शाश्वत स्त्रोत -सौर उर्जा, ग्रामविकासाची नवीन दिशा – फार्मर्स प्रोङुस कंपन्यांची निर्मिती व यशस्वी संचालन व ग्रामविकासाचे आदर्श नियोजन ह्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या विनोदी शैलीत ग्रामविकासाचे आदर्श नियोजन ह्या विषयावर मागदर्शन केले.कार्यक्रमास देवळा व चांदवड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरीक उपस्थित होते.

ग्रामोन्नतीतून देशोन्नती हा संकल्प ठेऊन ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहाय्यभूत व प्रबोधन करण्याचा महाराष्ट्र सरपंच संसदेचा हा कार्यक्रम असून यामुळे ग्रामविकासाला एक दिशा मिळणार आहे.ग्रामपंचायतीत पदापुरतीच असलेली मानसिकता बदलली पाहीजे, तसेच भाऊबंदकी व गटातटाचे राजकारण हि गाव विकासाला खीळ घालणारी गोष्ट आहे.एकाच कामा मागे न लागता गावातील प्रश्नांचे संकलन करून कामांना योग्य प्राधान्य क्रम द्यावा व गाव विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा करुन घ्यावा. – शरद बुट्टे पाटील ( पुणे जिल्हा परिषद सदस्य )

ग्रामविकासात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांना मार्गदर्शन व्हावे हया उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रा.पं. सदस्याने आपल्या कार्यकाळात वॉर्डात एक तरी असे काम करावे कि जे कायम स्मरणात राहील. गाव समृद्ध झाला तर मतदारसंघ समृद्ध होतो. केदा आहेर ( अध्यक्ष, नासिक जिल्हा मध्यवर्ती बँक )

ग्रामीण भागात वीजेची समस्या दूर करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याची गरज आहे. सौर उर्जेचा वापर शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगांसाठी करता येईल. यामुळे शाश्वत विकास होउन ग्रामीण भागातून शहराकडे रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी होईल. सौर उर्जा ही काळाची गरज आहे. राम भोगले ( उद्योगपती)

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!