Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

कार्गोपाठोपाठ पॅसेंजर चार्टर विमानाचे उड्डाण; नाशिक विमानतळ आंतरराष्ट्रीय सेवांसाठी सज्ज

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या विमानसेवेला आता खर्‍या अर्थाने गती मिळू लागली आहे. ओझर विमानतळावरून आर्यलॅण्डसाठी ९ सीटर चार्टर विमानाने काल अवकाशात झेप घेतली. त्यापूर्वीही ४५ टन मालवाहतुकीची क्षमता असलेल्या कार्गो सेवेद्वारे हजारो शेळ्या-मेंढ्यांची निर्यात दुबईत करण्यात आली होती.

कार्गो सेवेसोबतच आता आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवेसाठीची उड्डाणेही सुरू झाल्याने नाशिकच्या विमानसेवेने इतिहास रचला आहे. येणार्‍या काळात विमानतळाला अंतरराष्ट्रीय विमानसेवेचे वैभव प्राप्त होण्याची चिन्ह आहेत.

ओझर विमानतळावरून सोमवारी इजिप्‍तचे ३३० हे कार्गो विमान दुबईकडे झेपावले होते. या विमानाच्या माध्यमातून ४५ टन शेळ्या-मेंढ्यांची निर्यात कण्यात आली होती. त्या कामात अमिगो एव्हिएशनसोबतच एचएएल, कस्टम विभाग, कार्गोसेवा देणारी हॅलकॉन, ग्राऊंड हॅण्डलिंग पाहणारी बॅटस्,या संस्थांच्या सहकार्याने इतिहास नोंदवलेला होता. त्यापाठोपाठ आज फ्रीडम एअर सर्व्हिसेसचे नॉन शेड्यूल चार्टर बिझनेस प्लेनने नाशिकहून उड्डाण घेतल्याने येणार्‍या काळात मुंबईला सक्षम पर्याय म्हणून नाशिक विमानतळाकडे पाहिले जाण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या इतिहासाला सुवर्ण अक्षरात नोंदवण्याची वेळ आहे. मुंबईतील भार कमी करण्यासोबतच नाशिकच्या विमानतळाचा पुरेपूर वापर करण्यातून येथील उद्योग जगताला थेट परदेशी सेवा मिळण्याची संधी राहणार असल्याने ही सेवा आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.
– साजीद सय्यद, मुख्य कार्यकारी अधिकारी,अमिगो एव्हिएशन

मोठ्या कार्गोसोबतच छोट्या चार्टर पॅसेंजर विमानाने ओझर विमानतळावरून यशस्वी उड्डाण घेतल्यामुळे नाशिक जागतिक स्तरावर आपले पाय रोवत आहे. भविष्यात विमानतळावरून मोठ्या प्रमाणात विविध विमानसेवांची उड्डाणे होतील, असा विश्‍वास आहे. – खा.हेमंत गोडसे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!