Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

खा. पवारांकडून संसदेत प्रथमच मातृभाषेतून प्रश्‍न

Share

जानोरी। वार्ताहर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत प्रथमच मातृभाषा मराठीतून मतदारसंघाच्या समस्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कांदा, डाळिंब, द्राक्ष असेल, टोमॅटो, मका अशी पिकें घेतली जातात. तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रोसेसिंग युनिट मिळावेत, कोल्ड स्टोरेज मिळावेत, रेल्वे वॅगनची व कार्गो सेवेची उपलब्धता वाढावी, कांद्याला २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा. नियोजित निफाड तालुक्याील ड्रायपोर्टचे काम सुरु करण्यात यावे. ग्रामीण भागामध्ये गाव स्तरावर बेसिक डाटा उपलब्ध करण्यात यावा. सातबाराचा संगणकीकृत प्रक्रियाही जलद गतीने करण्यात यावी. विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सोलार प्रोजेक्ट जास्तीत जास्त देणे गरजेचे असल्याचे प्रश्नाद्वारे सांगितले.

ग्रामीण भागामधील आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली त्याबद्दल खा.डॉ. भारती पवारांनी अभिनंदन केले.त्याचप्रमाणे आरोग्य आणि शिक्षणावर भर देत असताना कुपोषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, सध्या पाण्यावरून गावागावात तालुक्या-तालुक्यात जिल्ह्यामध्ये वाद सुरु आहेत. याचा विचार करून जलशक्ती मंत्रालय उभारले त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

केंद्र सरकारने नार-पार ची योजना असेल, वांजुळ पाणी दमनगंगा तसेच मांजरपाडा प्रकल्प असेल हे लवकरात लवकर मार्गी लावून नाशिक जिल्ह्यासह जळगाव, अहमदनगर व मराठवाड्याला न्याय द्यावा हि देखील विनंती खा. डॉ. भारती पवार यांनी केली.

दिंडोरी मतदारसंघांमध्ये मका या पिकावर पडत असलेल्या लष्करी अळीचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची सुद्धा दखल घ्यावी, अशी मागणी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!