Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

रस्ता सुरक्षा दल विभागाची वाहतूक कार्यालयात बैठक

Share

नाशिक । शैक्षणिक प्रतिनिधी

शहर वाहतूक आयुक्तालय यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा दल (आरएसपी) या विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातील एकूण ५२ शाळांचे आर एसपी प्रतिनिधी शिक्षक या बैठकीस हजर होते.सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी शिक्षकांना संबोधित केले.

शाळांमधून जास्तीत जास्त प्रमाणात रस्ता सुरक्षा जनजागृती करण्याचे कार्य विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकांनी करून घ्यावे, कारण रस्त्यावरील अपघातात जास्तीतजास्त लोक मृत्युमुखी पडत असतात त्यामुळे आपण लोकांमध्ये हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचा वापर, सिग्नल जंपिंग टाळणे, सिग्नलचा वापर करणे, गाड्या व्यवस्थित पार्किंग करणे, ट्रिपल सीट वाहने चालविणे, ड्रिंक अँड ड्राइव्ह वाहन चालवीत असताना फोनचा वापर न करणे, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी कोणत्या प्रकारचे नियम माहीत नसताना गाड्या चालवितात त्यांनी योग्यरीत्या प्रशिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

शाळेतील विद्यार्थ्याना आतापासूनच वाहतूक नियमांचे धडे देणे गरजेचे आहे. शाळेतील वाहनचालक यांना आपण वाहतुकीचे नियम समजावून सांगितले पाहिजे. तसेच शाळा-शाळांमध्ये वाहतूक नियमांची नियमावली तयार करून फलकावर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांबद्दल जास्तीत जास्त सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या हितासाठी प्रयत्न केले जातील व शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने व जनजागृती घडवण्याच्या बाबत विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन एक छोटा पोलीस या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक पोलीस कर्मचारी हे प्रशिक्षण देतील असे आश्‍वासन पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी दिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!