Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

स्मार्ट सिटीतील बसथांब्यांची दुरावस्था

Share

सातपूर । प्रतिनिधी

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या नाशिक शहराच्या उपनगरांमध्ये नजर टाकल्यास लक्षात येईल की, अजूनही नाशिक व परिसरामध्ये नागरी सुविधांचा अभाव दिसून येतो आहे. एकीकडे स्मार्ट सिटीची कामे जोरदार सुरू असून त्या त्या ठिकाणच्या बसथांब्यांचे आकर्षक नवीन शेड बनविण्यात आलेले दिसतात.

मात्र. त्र्यंबक रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर असलेल्या बसथांब्याची फारच दुरवस्था झोली आहे. या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी ऊन, पावसाचा विचार न करता तसेच ताटकळत बसची वाट पाहात उभी राहतात. त्या ठिकाणी बसथांब्यावरील पत्रे उडालेले असून येथे बसथांबा आहे हेच मुळी लक्षात येत नाही.

शहरातील अनेक बसथांब्यांची अशीच अवस्था असून याकडे कोणी लक्ष देईल का? असा प्रश्‍न प्रवाशी वर्गाला पडला आहे. अनेकवेळा बसची प्रतीक्षा करत प्रवासी ऊन व पावसाची तमा न करता उभेच राहतात. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!