Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

आयमात उद्यापासून दोन दिवसीय बीटूबी मिट

Share

नाशिक । प्रतिनिधी

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या वतीने उद्योजकांच्या विकासासाठी गुरुवारी (दि.१८) व शुक्रवारी (दि.१९ )‘नाशिक बिझनेस मिट’चे आयोजन करण्यात आलेले आहे.

भारतात व महाराष्ट्रात गुंतवणूक येण्यासाठी शासन प्रयत्न सूरू असतांना उद्योजकांनी पूढाकार घेत नवे उद्योग येण्याच्या प्रयत्नांसोबतच बोहरील उद्योगांमध्ये व्यवसाय सधींचा शोध घेण्याच्या उद्देशाने ‘बी टू बी’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक बिझीनेस मिटच्या माध्यमातून ‘कॉर्पोरेट इव्हेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. आयमाने नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांना आमंत्रीत केलेले आहे. त्यात २० मोठया कंपनीचे अधिकारी या बिझीनेस मिटमध्ये सहभागी घेत आहेत. उद्योजकाशी सविस्थर चर्चा करण्यासोबतच नाशिकमधील कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्या बाबतची माहिती घेणार आहेत.

या नाशिक बिझनेस मिट मध्ये नाशिक मधील जवळजवळ १५० कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. नोंदणी केलेल्या उद्योगांनाच यात सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे नाशिक बिझीनेस मिट या उपक्रमामुळे नाशिक परिसरातील उद्योग नगरीला सुवर्ण दिवस येतील असा विश्‍वास आयमा अध्यक्ष वरुण तलवार यांनी व्यक्त केला.

या मिटच्या निमित्ताने आयमाने उद्योग क्षेत्रातील जाणकार तरुण उद्योजकांना सहभागी करुन त्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे.या माध्यमातून चर्चासत्र, बीटूबी मिट, प्लांट व्हिजीट यांचे काटेकोण नियोजन करण्यात आले असल्याचे मिट आयोजन समितीचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी सांगितले.

नाशिक बिझनेस मिट हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयमाचे अध्यक्ष वरूण तलवाऱ बिझनेस मिटचे चेअरमन निखिल पांचाल, सरचिटणीस ललित बुब़, उन्मेष कुलकर्णी, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र अहिरे, राजेंद्र पानसरे, योगिता आहेर, आयमा कार्यकारिणी सदस्य व नाशिक बिझीनेस मिट कमिटी प्रयत्न शिल आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!