Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण योजना; मुख्य महाप्रबंधकांचे स्पष्टीकरण

Share

नाशिक । प्रतिनिधी

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत. बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी विचारविनिमय करून काही महत्त्वपूर्ण योजना आखल्या जात आहेत. त्यामुळे भविष्यातही कंपनीकडून अविरत सेवा देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महाराष्ट्र बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक मनोजकुमार मिश्रा  यांनी स्पष्ट केले.

पुनरुज्जीवनासाठी आखल्या जाणार्‍या योजनांंमध्ये व्हीआरएस, ४ जी स्पेक्ट्रम देणे आणि बीएसएनएलकडे असलेल्या स्थावर मालमत्ता मोनेटाईज (बीएसएनएलच्या मिळकतींचा वेगवेगळ्या पर्यायांद्वारे उत्पन्न मिळवण्यासाठी वापर करणे) केल्या जाणार आहेत. तसेच मुख्य महाप्रबंधकांनी असेही स्पष्ट केले आहे की, कंपनीने आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळातही देशसेवा केली आहे. दुर्गम ठिकाणीसुद्धा परवडणारी सेवा दिली असून भविष्यातही अशीच अविरत सेवा देत राहू, असे स्पष्ट केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!