Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अकरावी साठी पहिल्या दिवशी दोन हजार प्रवेश निश्‍चित

Share

नाशिक । प्रतिनिधी
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द झाल्यानंंतर पहिल्या दिवशी शनिवारी (दि.१३ ) दोन हजार ३८  विदयार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. विज्ञान शाखेत सर्वाधिक ९७०  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. वाणिज्यला ७४२, कला शाखेत २८५ तर एमसीव्हीसीसाठी ४१ विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशाच्या गर्दीमुळे महाविदयालये गजबजली होती.

शहरातील ५९ महाविदयालयात २३ हजार जागांसाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिली कटऑफ यादी शुक्रवारी (दि. १२ ) रात्री उशिराने प्रसिद्ध झाली. या पहिल्या यादीत विज्ञान शाखेसाठी ६ हजार ३९६ पात्र ठरले. तर वाणिज्य शाखेला 5629, कला शाखेला 2563 आणि एमसीव्हीसीला २५७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एकूण १४ हजार विदयार्थ्यांना प्रवेश यादीत स्थान मिळाले आहे.

पात्र विद्यार्थ्यांना शनिवारपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे सुरू झाले आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १३, १५ आणि १६ तारखेला सकाळी ११ ते दुपारी 5 यावेळेत प्रवेश निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यानूसार पहिल्या दिवशी चारही शाखेतून २ हजार ३८  विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले.

दरम्यान, मंगळवारी (दि. १६) सायंकाळीच पहिल्या गुणवत्ता यादीतील कटऑफ व दुसर्या गुणवत्ता यादातील उपलब्ध जागांची माहिती जाहिर केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या भाग दोनमध्ये बदल करण्यासाठी १७ व १८ तारखेची मुदत असेल. तर २२ तारखेला सायंकाळी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!