Type to search

Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

देशासाठी ‘ट्रायथलॉन’ स्पर्धा जिंकणारच – अम्मार मियाँजी

Share

नाशिक । फारुक पठाण

भारत देशासाठी मेडल आणने माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट राहणार आहे. मागील एक वर्षापासून कडक सराव करीत आहे. रोज 6 तासांपेक्षा जास्त काळ सराव करून आंतरराष्ट्रीय ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेसाठी स्वत;ला तयार केले आहे. नाशिककरांची मोठी साथ माझ्यासोबत असून नक्की पदक आणणारच असा विश्‍वास नाशिकचे पहिले आर्यनमॅन अम्मार मियाँजी यांनी व्यक्त केला आहे.

2017 साली पहिले आयर्न मॅन चषक पटकावणारे नाशिकचे अम्मार मियाँजी आता यापेक्षाही दहापट खडतर असलेल्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेसाठी 17 जुलै 2019 रोजी लंडनला जात आहे. 21 जुलैपासून प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होणार आहे. अम्मारला सर्व स्तरावरून सहकार्य मिळत असून दाऊदी बोहरा समाजाकडून देखील मला पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

अम्मार मियाँजी हे भारतातून अशा प्रकारे खडतर स्पर्धेसाठी जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. लंडन येथील अ‍ॅलिथ्रोप शहरात ही स्पर्धा होणार आहे. अम्मार दररोज आपले नियमित कामे संभाळून कठोर अभ्यास करीत आहेत. ज्याप्रमाणे आयर्न मॅन चषक जिंकला होता त्याच प्रमाणे कठोर परिश्रम करून लंडनच्या ट्रायथलॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी करून देशासाठी आणखी एक चषक आणणार असा विश्‍वास अम्मार मियाँजी यांनी व्यक्त केला.

देशात फिटनेस बाबत जागृती व्हावी, हा देखील उद्देश असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. नाशिकला पोलीस आयुक्त असलेले डॉ. रविंद्रकुमार सिंगल देखील आर्यन मॅन झाले होते, त्यांनी देखील अम्मारचे विशेष कौतूक केले होते. 2017 सालापासून आता पर्यंत आर्यन मॅनबद्दल प्रचंड जागृती झाली असून यंदा सुमारे 22 जण यासाठी तयारी करीत असल्याचे समजते. अम्मारने मागील एक वर्षापासून विशेष सराव सुरू केला आहे.

यासाठी खाण्यापिण्याबरोबर शरीर स्वस्थ व तंदरुस्त ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. डॉ. भिष्मराज बाम यांनी त्यांना त्यावेळी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे त्यांनी म्हटले. सचिन गलांडे शरीरात शक्ती वाढविण्यासाठी मार्गदर्शन करीत असून डॉ. वैभव महाजन फिजियो आहेत. ते सराव दरम्यान दुखापत होणार नाही याची दक्षता घेतात.

दिपाली सोनवणे डायटबद्दल मार्गदर्शन करतात, तर विलास इंगळे सराव दरम्यान मोलाची साथ देतात. राजीव लुथरा सायकल मेंटनेंस व त्यातील बारकाव्यांवर लक्ष ठेवून आहे. असे अम्मार यांनी सांगितले. मागील वर्षी खराब हावामानामुळे ‘ट्रायथलॉन’ स्पर्धा पुर्ण झाली नव्हती, यामुळे यंदा मागील वेळेचे स्पर्धक देखील सहभागी होणार आहे.

20 तासांत 40 किमी स्विमींग
आयर्न मॅन स्पर्धेसाठी एक दिवसात 4 किलोमीटर पाण्यात पोहावे लागते तर 180 किलोमीटर सायकलिंग करून 42 किलोमीटर रनिंग करावी लागते. मात्र या ट्रायथलॉन स्पर्धेत यापेक्षा दहापटीने खडतर प्रवास करावा लागणार आहे. ट्रायथलॉनमध्ये दहा दिवसांत पहिल्या 20 तासांमध्ये 40 किलोमीटर पाण्यात पोहावे लागणार आहे. यानंतर चार दिवसांत त्यांना 1 हजार 800 किलोमीटर सायकलिंग करून यानंतर 420 किलोमीटर रनिंग करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत खुल्या पाण्यात पोहावे लागणार आहे.

कामे संभाळून सराव
नाशिकचे पहिले आयर्न मॅन अम्मार मियाँजी हे बांधकाम व्यवसा करतात. मात्र फिटनेसवर विशेष लक्ष देऊन त्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतला आहे. आताही लंडनला होणार स्पर्धेसाठी त्यांनी आपली नियमीत कामे संभाळून सराव केला आहे. रात्री उशीरा पर्यंत सराव करतांना ते सायकल चालवत किंवा धावत कसारा घाटापर्यंत जायचे. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतूक होत आहे. व त्यांनी देशासाठी पदक आणावे साठी प्रार्थना करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!