Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बुधवार पेठेतील धोकादायक वाडा पाडला

Share

जुने नाशिक | प्रतिनिधी

बुधवार पेठ आमदशाह चौकातील एक बंद पडलेला धोकादायक वाडा मनपा प्रशासनाकडून सायंकाळी पाडला. यावेळी दोन्ही बाजुचे मार्ग बंद करण्यात आले होते. बघ्यां मोठी गर्दी झाली होती. रस्सीच्या सहाय्याने वाड्याचा धोकादायक भाग पाडण्यात आला.

जुने नाशिक भागातील धोकादायक वाड्यांचा विषय गंभीर होत आहे. पावसाच्या संततधारामुळे दोन दिवसांपुर्वी जोगवाडा भागातील एका जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जीवित हानी झाली नाही, तरी दोन दुचाकींचे नुकसान झाले होते.

जुने नाशिक भागातील जुन्या व धोकादायक वाड्यांचा विषय दर पावसाळ्यात येतो, मात्र मनपा प्रशासन याकडे विशेष लक्ष देत नसल्याने पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांची तक्रार आहे.काल सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हा बंद वाडा पाडण्यात आला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!