Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

विनाअनुदानित गॅस सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीनंतर सामान्य नागरिकांना दिलासा देणारी खुशखबर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिली आहे. विना अनुदानित गॅस सिलेंडरचे भाव १००.५० रुपयांनी कमी झाले आहेत.

आज १ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे दिल्लीत घरगुती वापराचा सिलिंडर ६३७ रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित सिलेंडरसाठी ग्राहकांना ७३७.५० रुपयांऐवजी आता ६३७ रुपये मोजावे लागणार आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आज प्रसिद्धी पत्रक काढून सिलिंडरचे भाव घटल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने सिलेंडर दरात हे बदल करण्यात आले आहेत.

अनुदानित सिलेंडर घेणार्‍या ग्राहकांना सिलेंडर घेताना बाजार मूल्य द्यावे लागते. त्यानंतर अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केले जाते. ग्राहकांना एका वर्षात १२ अनुदानित सिलिंडर मिळतात.

गॅस सिलिंडर दरांत घट झाल्याने ग्राहकांना १४२.६५ रुपयाचे अनुदान मिळेल. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर ४९४.३५ रुपये होतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!