Type to search

Featured नाशिक

नागरी सुविधेचा ५६ लाखांचा निधी परत

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची लक्तरे सदस्यांनी काढलेली असताना प्रशासन प्रमुख असलेल्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या हलगर्जीपणामुळे प्राप्त झालेला नागरी सुविधेचा ५६ लाखांचा निधी शासनाकडे जमा झाल्याचे समोर आले आहे.

नागरी सुविधेच्या ५६ लाख निधी वितरणाच्या फाईलवर वळेत डॉ. गिते यांच्याकडून स्वाक्षरी न झाल्याने हा निधी खर्च न होता शासनाकडे जमा झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी फाईल पेंडन्सी काढण्यास सोमवारी आढावा बैठक घेतली.

या बैठकीत अनेक विभागातील फाईल पेंडीग असल्याचे निर्देशनास आले. यात ग्रामपंचायततर्ंगत जनसुविधेचा साडेतीन कोटींचा निधी वाटपाची फाईल पडून असल्याचे तसेच शाळा दुरूस्ती निधी प्राप्त होऊन नियोजनाअभावी निधी पडून असल्याचे समोर आले होते. यावर अध्यक्षा सांगळे यांनी जनसुविधेचा निधी तत्काळ वितरीत करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी दिले. त्यानंतर सदर फाईल निकाली निघाली.

ग्रामपंचायतींना नागरी सुविधा अतर्ंगत ५६ लाख निधी वितरण झाले नसल्याची बाब निर्देशनास आली. यावर निधी वितरीत का झाला नाही याचा शोध घेण्यात आला असता ही या फाईलवर सीईओंनी वेळात स्वाक्षरी न केल्याचे दिसून आले.

याबाबत फाईल सीईओं कार्यालयता पोहचली होती. परंतू, वेळात ती निकाली न निघाल्याने हा निधी खर्चा अभावी शासनाकडे जमा झाला. केवळ दुर्लक्ष झाल्याने फाईलवर स्वाक्षरी न झाल्याची चर्चा आहे. शासनाकडे जमा झालेला हा निधी मिळविण्यासाठी आता पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे. यात निधी मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!