Type to search

Featured नाशिक

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले त्वरित मिळावे

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी

विविध शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले त्वरित मिळावे आणि प्रवेशासाठी लागू केलेल्या विविध अटी शिथिल कराव्यात याबाबत आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

शासनाने पारदर्शक आणि वेळेत काम होण्याच्या दृष्टीने प्रवेशाची व प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांची प्रक्रिया ऑनलाईन केली. ही ऑनलाईन प्रक्रिया नागरिकांच्या हितासाठी व वेळेत दाखले मिळावे यासाठी सुरू केली परंतु असे असतानादेखील विद्यार्थी व पालकांना विविध शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले वेळेत मिळत नसल्याने आ. हिरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले त्वरित मिळण्यासाठी शासन स्तरावरून जिल्हा प्रशासनाला त्वरित आदेश देण्यात यावेत तसेच ऑनलाईनच्या तांत्रिक अडचणी त्वरित दूर कराव्यात, दाखल्यांअभावी मुलांचे प्रवेश थांबू नये, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता अटी शिथिल करून प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी केली.

नाशिक जिल्ह्यात सर्व्हर डाऊनच्या नावाखाली २७९०० दाखले प्रलंबित असल्याने पालक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सादर करण्यास कालावधी वाढवून देण्यात यावा. यासाठीची जी अट असेल ती शिथिल करावी. तसे परिपत्रक त्वरित काढण्यात यावे याबाबतची मागणी आ. हिरे यांनी सभागृहात केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!