Type to search

Featured नाशिक

हार्डकोर्ट बाईक पोलोसाठी राज्याचा संघ घोषित

Share

नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र हार्डकोर्ट बाईक पोलो संघाच्या कर्णधारपदी नाशिकचा खेळाडू अविनाश वाघ यांची निवड झाली आहे. पतियाला (पंजाब) येथे २८ ते ३० जूनच्या दरम्यान संपन्न होणार्‍या पहिल्या राष्ट्रीय हार्डकोर्ट बाईकपोलो राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र हार्डकोर्ट बाईक पोलोचा संघ सहभागी होणार आहे.

या संघाची निवड नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघाची घोषणा राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ.उदय डोंगरे, सरचिटणीस दीपक निकम , यांनी केली असून संघाचा कर्णधारपदी अविनाश वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र संघ खालीलप्रमाणे
अविनास वाघ-कर्णधार (नाशिक), २) कृष्णा शेवाळे- उपकर्णधार (बुलडाणा), ३) निखिल गवळी-(अमरावती), करण भंडारे ( नाशिक), अदिती हिरे (नाशिक), सूरज पिसाळ (नाशिक), अमोल शेवाळे (बुलडाणा), संघ मार्गदर्शक व्यवस्थापक-मयूर पांडुरंग गुरव (नाशिक).

या निवड झालेल्या सर्व खेळाडूंना डॉ. उदय डोंगरे, दीपक निकम, क्रीडा उपसंचालक, चंद्रकांत कांबळे, आनंद खरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, राजू शिंदे, मनीषा काठे, ऋषिकेश शिंदे, अमोल आहेर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!