अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ

पंतप्रधानांची घोषणा : कष्टाचे कौतुक

0

नवी दिल्ली | दि. ११ वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या कष्टाचे कौतूक करताना त्यांच्या अडचणीही मोदींनी जाणून घेतल्या. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढही केली.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार ३००० रुपये मानधन घेणार्‍या अंगणवाडी सेविकांना आता ४५०० रुपये मिळणार आहेत. तर २२०० रुपये मानधन घेणार्‍या अंगणवाडी सेविकांना ३५०० रुपये मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील अंगणवाडी सेविका, आशा आणि एनएनएम व प्रमुख सेविकांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. आपल्या कार्याने अंगणवाडीची आणि स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या काही अंगणवाडीसेविकांशी मोदींनी संवाद साधला.

त्यावेळी, कौतूक करताना त्यांचे प्रश्नही जाणून घेतले. देशाचा पंतप्रधान सांगू शकतो की, त्याचे लाखो हात आहेत आणि ते हाथ म्हणजे तुम्ही, अशा शब्दात मोदींनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे कौतूक केले.

 

LEAVE A REPLY

*