Type to search

Featured नाशिक

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘कृती दल’

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला असून अभिनव उपक्रम राबवत थेट कृती दल (टास्क फोर्स) ची स्थापना केली आहे. यात स्वता: जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याच्यांसह जिल्ह्यातील अन्य मुख्य अधिकारी असणार आहे.

कर्जबाजारीपणा, पिकांचे पडलेले भाव अशातच अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या सततच्या संकटांमुळे जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत ४२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या निधीत दुपटीने वाढ तसेच पीकविमा, विविध आपत्ती आणि कर्जमाफीच्या माध्यमातून तब्बल ४८ हजार कोटी थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा राज्य सरकारचा दावा असतानाही राज्यातील शेतकरी आत्महत्यांची संख्या चिंताजनक आहे.

एकट्या नाशिक जिल्ह्यात तर गत वर्षी १०८ शेतकजयांनी आणि यंदा २५ जून अखेर ४२ शेतकर्‍यांनी विविध करणांनी आत्महत्या केल्या आहेत. विषेशत आत्महत्या करणर्‍यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे आता या वाढत्या शेतकरी आत्महत्यांनी व्यथित झालेल्या जिल्हाधिकारी मांढरे यांनी यातूनच ‘टास्क फोर्स’ ची निर्मिती केली आहे.

शिवाय सावकाराच्या जाचातुन शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी देखिल तक्रार प्राप्त होणार्‍या सावकारावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

शासनाकडून शेतकर्‍यांसाठी कर्ज माफी आणि सन्मान निधी तसेच इतर योजनांनंतरही आत्महत्यांचे सत्र वाढत असल्याने जिल्हाप्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे या गरज भासल्यास जिल्हा न्यायधीशांची देखिल मदत घेतली जाणार असून ही समिती सावकार,बॅकांकडून होणारी सक्तीची वसुली यावर लक्ष ठेवून कारवाई करणार आहे.

विविध योजनोंची घालणार सांगड
‘टास्क फोर्स’ द्वारे जिल्ह्यातील विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातुन राबवण्यात येणार्‍या योजनांची सांगड घालून त्या शेतकर्‍याचे जिवनमान उंचवण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. उदा. कृषी विभागाकडून दिले जाणरे शेततळे, बियाने, खते, ट्रॅक्टर, कांदाचाळ, यासह अन्य योजना तसेच बँकांकडून, महामंडळांकडून दिले जाणारे कर्ज, आदिवासी विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन राबवण्यात येणार्‍या योजना यांची सांगड घालून त्याचा जास्तीतजास्त लाभ गरजू शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकयांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे,रोजगार मिळावा यासाठी देखिल या टास्क फोर्स च्या माध्यमातुन काम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!