Type to search

Featured नाशिक

घोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली

Share

देवळाली कॅम्प  | वार्ताहर

येथील चारणवाडी परिसरात राहणारे सामाजिक नेते गुंडाप्पा देवकर (वय ४६) यांच्या मालकीची मर्सिडीज बेंन्स जीएल ३५० या मॉडेलच्या एमएच ०४ इझेड ०९९९ या क्रमाकांच्या गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घोरवड घाटात पेट घेतला. यामध्ये सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गुंडाप्पा देवकर हे देवळाली कॅम्प चारणवाडी येथील रहिवासी आहे. त्यांचा व्यवसाय व्यापार व शेती असून आपल्या कुटुंबासह घरी परतत असतांना सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात आज  दि.२० रोजी दु. दीड वाजेच्या सुमारास गाडीतून जात असतांना पाठमागील बाजूस वायरिंग शोर्ट सर्किट झाल्याचा आवाज आल्याने ते ड्रायव्हर सुनील यांस गाडी बाजूला घेण्यास सांगितले.

तोपर्यंत गाडीमध्ये बसलेले आई जनाबाई,पत्नी सरिता व चार मुले खाली उतरले. मागील बाजूचा दरवाजा उघडला.त्यावेळी शिटाखाली धूर निघत असल्याचे दिसले. त्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याने याबाबत सिन्नर पोलिस स्थानक येथे या घटनेबाबत माहिती दिली.

त्यानंतर काही वेळाने अग्निशामक वाहन दाखल झाली.कर्मचार्‍यांनी आग विझविली. या घटनेत गाडीचे पाठीमागील दोन्ही टायर,सर्व शीट,डेशबोर्ड,स्टेरिंग असे अंदाजे पन्नास लाख रु.नुकसान झाले आहे याबाबत त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!