Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पाणी जपून वापरा; उद्या दोन्ही वेळ आणि परवा सकाळी शहरात पाणी नाही

Share

नाशिक- प्रतिनिधी

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विविध विभागातील कामे करण्यात येणार असल्याने उद्या शनिवार दि.८ जून रोजी संपूर्ण दिवस व रविवार दि. ९ जून रोजी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा होणार नाही.

नाशिक पश्‍चिम विभागात बुधवार पेठ जलकुंभ येथील ८ इंची व्हॉल्व्ह बदलणे व क्रॉस कनेक्शन करणे व त्यासंबंधित इतर कामे करणे.नाशिक पूर्व विभाग कालिका पंपिंग ५०० बाय ५०० क्रॉस कनेक्शन करणे मुकणे प्रकल्पाचे पाणी कथडा कालिका व भाभानगर जलकुंभास देण्यासाठी पाईपलाईन जोडणी करणे,

कथडा जलकुंभ येथील ५०० मी.मी. व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे, चढ्ढा पार्क ते वडाळागांव मुख्य वितरण वाहिनीवरील ४०० मी.मी व उपवितरण वाहिनीवरील २५० मी.मी. व्यासाचे व्हॉल्व्ह बदलणे व इतर आवश्यक कामे करणे, आयटी पार्क (नाल्याजवळ) जलकुंभाजवळ १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी पाईप लाईन लिकेज काढणे व इतर आवश्यक कामे करणे.

पंचवटी विभाग-पंचवटी प्रभागातील कोणार्कनगर जवळ जलकुंभाच्या इनलेटचे क्रॉस कनेक्शनचे कामे करणे. सातपूर विभाग-नाशिक मनपाचे बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र यांना पाणी पुरवठा करणारी कच्च्या पाण्याची १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी मुख्य गुरुत्व वाहिनीचे दुरुस्तीचे कामे करणे.आदी कामे करण्यात येेणार आहेत.

त्यामुळे उद्या शनिवार दि. ८/६/२०१९ रोजी सकाळी ९ वाजेपासून पूर्ण दिवस व रविवार दि. ९/६/२०१९ रोजी सकाळचा संपूर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!