Type to search

Featured नाशिक

वाळूची 19 वाहने ताब्यात

Share

देवळा। प्रतिनिधी

नासिक ग्रामीण व देवळा पोलिसांनी आज पहाटे वाळूची वाहतूक करणारे 19 वाहने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. जे. राजपूत यांनी दिली.

अवैधरीत्या चालणार्‍या वाळू वाहतुकीचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक आर. पी. सिंघ (नासिक ग्रामीण) यांनी दिलेल्या आदेशान्वये देवळा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री दीड ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत नासिक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मोते यांचे पथक व देवळ्याचे पोलीस निरीक्षक खंडेराव रांजवे, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. राजपूत, निलेश सावकार आदी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली .

वाळूची वाहतूक करणारे हायवा, ट्रक आदी वाळूने भरलेली 19 वाहने ताब्यात घेतली. या वाहनांचे मालक इगतपुरी, चांदवड, नासिक, नासिक रोड, मालेगाव, घोटी, निफाड आदी ठिकाणचे रहिवासी आहेत. वाहन मालकांनी त्यांचे परवाने व इतर कागदपत्र पोलिसांना सादर केली आहेत. देवळा पोलिसांनी याबाबत उपविभागीय अधिकारी भंडारी व तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांना माहिती दिली आहे.

महसूल विभागामार्फत दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाळू वाहतूक करणे, गौण खनिज वाहतूक नियमभंग आदींबाबत चौकशी झाल्यानंतर आदेशानुसार या वाहन मालकांवर गौण खनिज वाहतूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. जे. राजपूत यांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!