Type to search

Featured नाशिक

जिल्ह्यात 325 तर विभागात 1300 टँकर

Share

नाशिक । प्रतिनिधी

दुष्काळाचे संकट तीव्र होत असून जिल्ह्यात टँकरची संख्या ही 325 च्या पुढे गेली आहे. तर, विभागात 1300 टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. मान्सूनच्या दमदार सरी कोसळण्यासाठी जून अखेर उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते बघता पुढील काळात टँकरची संख्या वाढणार आहे.विशेष म्हणजे पावासाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यात देखील टँकरच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यात दुष्काळाचे चटके तीव्र होत आहे. ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके व 17 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. जानेवारीपासूनच ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून पाण्यासाठी चारी दिशा हिंडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नदी, बंधारे, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पाणी टंचाईने कळस गाठला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 325 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये 22 शासकीय तर 303 खासगी टँकर फेर्‍या सुरू आहे.

एकट्या नांदगाव तालुक्यात 69 तर, त्या खालोखाल सिन्नर तालुक्यात 61 टँकर सुरू आहेत. येवला, बागलाण व मालेगाव हे तालुके देखील तहानलेले आहेत. चार तालुके मिळून टँकरची संख्या ही 200 च्या आसपास आहे. प्रशासनाने तहान भागविण्यासाठी गावासाठी 118 तर, टँकरसाठी 92 विहिरींचे अधिग्रहण केले आहे. मान्सूनच्या दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असून मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार आहे. त्यामुळे पुढील काळात टँकरची मागणीत वाढ होणार आहे. कळवण, नाशिक, निफाड, हे तालुके अद्याप टँकरमुक्त आहे.

तालुकानिहाय टँकर

बागलाण – 38
चांदवड – 14
दिंडोरी – 1
देवळा – 15
मालेगाव – 49
नांदगाव – 69
सुरगाणा – 7
पेठ – 3
सिन्नर – 61
त्र्यंबक – 7
येवला – 49

फेर्‍या प्रत्यक्ष – 749
मंजूर फेर्‍या – 835

गावे – 240
वाडी – 859

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!