Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

नाशिक पश्‍चिम मतदारसंघात लागणार दोन बॅलेट युनिट; प्रशासनाची डोकेदुखी वाढली

Share

नाशिक । प्रतिनिधी

अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील १५ मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक पश्‍चिम मतदारसंघात तब्बल १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक प्रक्रियेसाठी दोन बॅलेट युनिट लावावे लागतात. त्यामुळे नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावावे लागणार आहेत.

या मतदारसंघात दुप्पट मतदान यंत्रे लागणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून उपलब्ध यंत्रांची पुरवणी सरमिसळ प्रक्रिया निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस (ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीद्वारे करण्यात आली. प्रत्येक वेळी अशीच प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने वाढलेल्या उमेदवारी संख्येने निवडणूक यंत्रणेचीही डोकेदुखी वाढली आहे.

निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशसह बंगळुरू येथील बेल कंपनीकडून मतदान यंत्रे प्राप्त झाली. या यंत्रांची बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम पुरवणी सरमिसळीकरणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांंच्या उपस्थितीत पार पडली. यात प्रामुख्याने नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्याने त्या ठिकाणी दोन बॅलेट युनिटची आवश्यकता आहे.

या विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान केंद्र संख्या ३६५ असून २० टक्के बॅलेट युनिट जादा म्हणजेच ४३८ बॅलेट युनिटस् पूर्वी लागणार होते. आता त्याच्या दुप्पट ८७६ यंत्रे लागणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त बॅलेट युनिटस्चीही प्रथम पुरवणी सरमिसळ प्रक्रिया (फर्स्ट सप्लिमेंटरी रॅण्डमायझेशन) करणे आवश्यक होते. त्यानुसार ती पूर्ण करून या यंत्रणांचे वितरण मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्‍यांकडे करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे, ईव्हीएमचे नोडल अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!