Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

दारणा पुलाच्या कठड्याची डागडुजी; ‘देशदूत’ने उठवला होता आवाज

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

चालू वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे दारणा नदीवरील नानेगाव व शेवगेदारणा येथील पूल पाण्याखाली आले होते. त्यात पुलाचे कठडे वाहून गेल्याने हा मार्ग धोकादायक बनला होता. याबाबत ‘देशदूत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेत पुलाच्या कठड्याची डागडूजी सुरू केली आहे.

१९९५ मध्ये युती शासनाने दारणा नदीवर शेवगेदारणा व नानेगाव येथे पुलाची उभारणी केली. २००२ मध्ये हे पूल पूर्णत्वास आले. मात्र गेल्या १७ वर्षांत या पुलावरून पहिल्यांदाच पाणी वाहिले. त्यामुळे भविष्यात या पुलाला धोका होऊ शकतो.

सध्या नदीचे पाणी ओसरले असून कठडे वाहून गेल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांसह पादचार्‍यांचा तोल जाऊन नदीपात्रात पडण्याचा धोका वाढला होता. यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांना पालक हाताला धरून पूल पार करून देत होते. आजपासून या पुलाची डागडुजी सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!