Type to search

Featured maharashtra नाशिक

इयत्ता दुसरी, अकरावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार

Share
नाशिक | प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० या वर्षापासून इयत्ता दुसरी व अकरावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलण्यात येणार आहेत. ही पाठ्यपुस्तके पुणे येथील पाठ्यपुस्तक मंडळातर्फे बदलण्यात येणार असून पुढील वर्षी तिसरी व बारावीची पाठ्यपुस्तके बदलतील. या बदलाची माहिती विद्यार्थी, पालक व पुस्तक विक्रेत्यांनी करून घ्यावी, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाने केले आहे.

इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम निश्‍चित करण्यासाठी तयार केलेल्या अभ्यास मंडळातर्फे टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम बदलण्यात येत आहेत. यावर्षी शैक्षणिक वर्षातील इयत्ता दुसरी व अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे.

पुढील वर्षी इयत्ता तिसरी व बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल. मागील वर्षी इयत्ता पहिली ते आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर यावर्षी दुसरी, अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे.

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम निश्‍चित करण्यासाठी एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले आहे. या महामंडळातर्फे हे बदल करण्यात येत आहेत. तीन वर्षांपासून अभ्यासक्रम व अभ्यास मंडळांमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झालेले आहेत.

पाठ्यक्रमातील नवी पुस्तके वापरात आल्यानंतर त्यावर नवा वाद उपस्थित झाल्याचे संदर्भ काही पुस्तकांना आहे. त्यामुळे पुस्तकांची छपाई होण्याअगोदरच असे वाद निर्माण होऊ नये यासाठी अभ्यासक्रमातील बदलांबाबत संबंधित यंत्रणांकडून गोपनीयताही ठेवण्यात येत आहे.

बालभारतीच्या पुस्तकनिर्मितीचे कामही विद्या प्राधिकरणाकडे देण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने चालत आलेली अभ्यास मंडळे बरखास्त करून एकाच अभ्यास मंडळाची निर्मिती एप्रिल २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर हे काम प्राधिकरणाकडे देण्यात आले होते.

सन २०१६-१७ मध्ये शैक्षणिक वर्षात सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात येऊन त्यावेळेच्या पुढील वर्षात अभ्यास मंडळात काही बदल करण्यात आले होते. सन २०१७-१८ मध्ये इयत्ता पहिली ते आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलला गेला, तर यंदाच्या वर्षी इयत्ता दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!