Type to search

डाळी महागल्या

Featured maharashtra नाशिक

डाळी महागल्या

Share
नाशिक | प्रतिनिधी
डाळींचे उत्पादन घटल्याने त्यांचे दर कडाडू लागले आहेत. शहर परिसरातील किराणा दुकानांत जवळपास सर्वच डाळींचे किरकोळ विक्रीचे दर किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत.
पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील होलसेल बाजारात डाळींचे दर किलोमागे पाच ते १० रुपयांनी वाढले असताना किरकोळ दुकानांत तूरडाळीने शंभरी ओलांडली आहे. मसूर, मूगडाळ, उडीद तसेच चणाडाळीच्या किमतीही किलोमागे ८५ ते ९० रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत.
नाशिक येथे राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील लातूर, अकोला, परभणी व आजूबाजूच्या भागांतून डाळींचा पुरवठा केला जातो. गेली दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने डाळींचे उत्पादनही उत्तम झाले होते. यंदा मात्र देशभरात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर दिसू लागला असून आवक काही प्रमाणात घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये डाळींचे दर हळूहळू वाढू लागले आहेत.
आवक घटल्याने दरही वाढू लागले असून होलसेल बाजारात ५० रुपये किलोने विकली जाणारी मसूर डाळ सध्या ६० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. किरकोळीत हाच दर ७५ ते ८० रुपयांच्या आसपास आहे. होलसेल बाजारात ८० ते ९० रुपये किलोने मिळणारी तूरडाळ किरकोळीत १०० ते ११० रुपये किलोने विकली जात आहे. पुढील पंधरवड्यात किरकोळ बाजारपेठेत डाळींचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
होलसेल बाजारात डाळी महाग झाल्या आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात डाळींच्या किमतीत १५ ते २० रुपयांचा फरक पडला आहे. यापुढेही डाळींचे भाव वाढू शकतात.दिनेशकुमार, होलसेल डाळविक्रेता
डाळ              होलसेल         किरकोळ (किलोमध्ये)
तूर –               ९० रु.            १०० ते ११० रु.
मूग –              ८५ रु.              ९० ते ९५ रु.
उडीद –            ६० रु.               ७० ते ७५ रु.
काळे उडीद-       ६० रु.               ७० ते ७५ रु.
मठ –              ८५ रु.               ९५ ते १०० रु.
मसूर –             ६० रु.                 ७० रु.
चना –              ६० रु.              ७० ते ७५ रु.
हिरवी मूग-        ८० रु.              ९० ते ९५ रु.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!