Type to search

खुल्या मांस विक्रीला आळा कधी बसणार ? 

Featured नाशिक

खुल्या मांस विक्रीला आळा कधी बसणार ? 

Share

सातपूर | प्रतिनिधी

सातपूरच्या श्रमीक नगर ते कार्बन नाका रस्त्याच्या कडेला सर्रास उघड्यावर मांस विकीची दुकाने थाटलेली आहे हे नाशिकसारख्या स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहराला न शोभणारे आहे.उघड्यावर मांस विक्रीला बंदी असताना महानगर पालिका याकडे डोळेझाक करून मांस विक्रेत्यांना एक प्रकारचे अभय देते की काय असा संतप्त सवाल नागरीकांनी व्यक्त केला आहे .

नाशिक तिर्थक्षेत्राबरोबरच औद्योगिक वसाहती मुळे नावारूपाला आलेले शहर आहे.परंतू नियम धाब्यावर बसवून याठिकाणी उघड्यावर होणारी मांसविक्री घृणास्पद आहे.मांस विक्रीमुळे आजूबाजूला अस्वच्छतेचा अभाव दिसतो व दुर्गंधी पसरते वास्तविक ह्या सर्व मांस विक्रेत्यांना महानगर पालिकेने एकाच ठिकाणी बंदीस्त जागेत स्थलांतरीत करणे गरजेचे आहे.

परंतू मनपाच्या स्वच्छता विभागाचा याकडे कानाडोळा का ?असा सवाल उपस्थित होतो नाशिकची वाटचाल स्मार्टसिटीकडे सुरू असतांना उघड्यावर मांसविक्री मुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी मनपाने घेणे क्रमप्राप्त आहे.

सातपूर व परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगतच उघड्यावर मांसविक्रीचे चित्र न शोभणारे असून मनपाच्या आरोग्य विभागाने त्यांच्यावर कारवाई करून उघड्यावर मांस विक्री वर बंदी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!