Type to search

Featured नाशिक

अशोकनगर बनले चायना टाऊन

Share

 

सातपूर |प्रतिनिधी

अशोक नगर पोलीस ते श्रमिकनगर परिसरात अनधिकृत चायनिज खाद्य पदार्थांचे हातगाडे लागलेले असून चायना टाऊनच बनले आहे.या विक्रेत्यांनी रितसर परवाने घेतलेले आहे का? नसेल तर अन्न व औषध प्रशासन मेहेरबान आहे का? याबाबत नाशिक महानगरपालिका काय कारवाई करणार ? असे अनेक प्रश्न भेडसावतात.

सध्याची युवा पिढी चायनिज फूडकडे जास्तच आकर्षित होतांना दिसते त्यामुळे खवैय्यांची संख्या वाढत चालली आहे.मात्र हे पदार्थ तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येते का? हा संशोधनाचा विषय आहे.दररोज सायंकाळी या भागात फेरफटका मारल्यास लक्षात येईल की पदार्थ बनवितांना तेलाची फोडणी देताना मिरचीचा ठसका  इतका भयानक असतो की पायी चालणाऱ्या पासून ते दुचाकीस्वाराला देखील याचा त्रास होतो कधीतर तेलात मिरची टाकल्या नंतर डोळ्यापर्यंत या मिरचीचा त्रास डोळ्यांना जाणवतो व दुचाकी स्वाराला उभे राहून डोळे पूसावे लागतात ,खोकला देखील येतो.

या परिसरात फिरणाऱ्या वयोवृद्ध किंवा दमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा त्रास सहनच करावा लागतो याचा मानवी शरिरावर दुष्परिणाम होऊन आरोग्याला हानीकारक तडक्याचा त्रास या चायनिज फुडच्या विक्रेत्यांकडून होतो मात्र हा त्रास सर्वच निमुटपणे सहन करतात. या विक्रेत्यांकडे खरोखर रितसर परवाना आहे का ?

अन्न व प्रशासन विभागाची रितसर परवानगी घेतली आहे का ? याची चौकशी कोण करेल. हे प्रश्न सर्वांनाच भेडसावतात परंतू याबाबत तक्रार करण्यासाठी कोणी धजावत नाही . परवानगी नसेल तर कोणाच्या छत्र छायेखाली हे लोक हा व्यवसाय करतात यांना अभय कोणाचे अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू होते.

हल्लीची तरुण पिढी फक्त स्वाद घेण्याकडे वळलेला दिसतो चविष्ठ लागणारे हे खाद्यपदार्थ कोणत्या तेलात तयार करतात , तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरोखर चांगल्या दर्जाचे आहे का ?याची तपासणी होणे अपेक्षित आहे. नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विनापरवाना धारक चायना फूड विक्रेत्यांवर महानगरपालीका कारवाई करणार का ? असा सवाल व्यक्त होत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!