Type to search

Featured नाशिक

ज्यो स्टीक-पेका स्टॅन्झ उद्योगात करार

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या ज्यो स्टीक अ‍ॅडेसिव्ह या उद्योगाने जर्मनीच्या पेका स्टॅन्झ अ‍ॅण्ड क्लेबेटेक्निक जीएमबीएच अ‍ॅण्ड कंपनीसोबत संयुक्तपणे उद्योग उभारणीच्या सामंजस्य करारावर अंतिम स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या गुंतवणूक करारामुळे नाशिक परिसरात परदेशी गुंतवणुकीच्या आगमनामुळे चैतन्याचे वातावरण आहे.

नाशिकमधील ज्यो स्टीक अ‍ॅडेसिव्ह प्रा. लि. ही १९९६ पासून अ‍ॅडेसिव्ह टेपच्या क्षेत्रात व्यवसाय करीत आहे. तर पेका स्टॅन्झ अ‍ॅण्ड क्लेबेटेक्निक जीएमबीएच अ‍ॅण्ड कंपनी ही ४५ वर्षांपासून या क्षेत्रात व्यवसाय करीत आहे.

युरोपमधील सगळ्यात मोठी ‘कन्व्हर्टर’ म्हणून कंपनीची ओळख आहे. जर्मन कंपनी ‘पेका स्टॅन्झ अ‍ॅण्ड क्लेबेटेक्निक जीएमबीएच अ‍ॅण्ड कंपनी’ या उद्योगासोबत व्यावसायिक संबंध स्थापन करणार्‍या सामंजस्य करारावर मंगळवारी निमा हाऊस येथे स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

या कारखान्यातून उत्पादित होणार्‍या उत्पादनांपैकी ६० टक्के उत्पादन निर्यात केले जाणार असून ४० टक्के उत्पादन भारतीय बाजारपेठेेत विक्री केले जाणार आहे. या करारामुळे ज्यो स्टीकची वार्षिक उलाढाल ४० कोटींवरून ३०० कोटींवर पोहोचणार असल्याने कंपनीतील कामगारांचाही उत्साह वाढला आहे.

यावेळी ज्यो स्टीक अ‍ॅडेसिव्हचे संचालक जयंत जोगळेकर, ऑपरेशन्स हेड विजय पाटील, पेका स्टॅन्झ ऍण्ड क्लेबेटेक्निक जीएमबीएच अ‍ॅण्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अलेक्झांडर नेगेली तसेच अल्कोर क्रॉस बॉर्डर, एम अ‍ॅण्ड एम प्रा. लि.चे प्रतिनिधी राघवेंद्र अडोकिया आदी उपस्थित होतेे. यावेळी निमाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिकचे वातावरण, येथील कार्यक्षमता व गुणवत्ता येणार्‍या काळात निश्‍चितच कंपनीच्या विकासाला वेगळी उंची गाठण्यासाठी पोषक आहे.
– अलेक्झांडर नेगेली, व्यवस्थापकीय संचालक

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!