Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

सायखेडा येथे शनिवारी ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव; नामको हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटलचे सहकार्य

Share

नाशिक ।प्रतिनिधी

‘विकासाचा शिल्पकार’ ठरलेले नाशिकच्या मातीतील एकमेव दैनिक ‘देशदूत’ने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात  पदार्पण केले आहे. यानिमित्त आरोग्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात २० ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (दि.२८) निफाड तालुक्यातील सायखेडा येथे महिलांसाठी आरोग्य महोत्सव भरवण्यात येणार आहे. मविप्र संस्थेच्या सायखेडा येथील महाविद्यालयात सकाळी १० ते ५ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

आरोग्य महोत्सवासाठी नामको हॉस्पिटल आणि नवजीवन हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे. नवजीवन हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.नेहा लाड, नामको हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अतुल डहाळे, डॉ. हेमराज दळवी, डॉ. पंकज दाभाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली ठाकरे, डॉ. श्रद्धा वाळवेकर यावेळी तपासणी व मार्गदर्शन करतील. शिबिरात ओरल कॅन्सर तपासणी, रक्तशर्करा तपासणी तसेच रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

‘देशदूत’ने समाजप्रबोधनासोबत सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. समाज जीवनात आधुनिकता आणि जागरुकता आलेली असली तरी महिलांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष होताना दिसते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हे वास्तव अधिक भीषण आहे. या प्रश्‍नाकडे ‘देशदूत’ने गांभीर्याने लक्ष वेधले असून या महोत्सवात महिला आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘आरोग्य महोत्सव’ हा त्याचाच भाग आहे.

सिन्नर शहरातून या महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सिन्नर तालुक्यातील महिलावर्गाचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायखेडा येथे होणार्‍या आरोग्य महोत्सवाचा सायखेडा, चांदोरी, निफाडसह तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!