Type to search

Featured नाशिक

पाणी सोडल्याने गोदामाईत सूर मारण्यासाठी गर्दी

Share

नाशिक | प्रतिनिधी

गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने कोरडीठाक पडलेली गोदामाई ऐन उन्हाळ्यात खळखळली आहे. तुडुंब वाहणारे गोदापात्र पाहून डोळ्यांना गारवा मिळत आहे. उष्णतेपासून थंडावा मिळावा; यासाठी रामकुंड व गोदापात्रात पोहोण्यासाठी तरुणाईची गर्दी होत आहे.

तापमानात वाढ झाली असून, पारा पुन्हा चाळिशीकडे झुकला आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. नदीला पाणी सोडल्यामुळे पोहोण्यासाठी गांधी तलाव आणि रामकुंडाकडे तरुणांची पावले वळत आहे. दोन दिवसांपूर्वी नगरसाठी धरणातून आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे गोदापात्र प्रवाहीत झाले आहे.

ही संधी साधत उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी पोहोण्यास गर्दी झाली आहे. विशेषत: दुपारच्या वेळेत रामकुंड व गोदापात्राला गर्दीमुळे स्विमिंगपूलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काहीजण ही संधी साधत पोहोण्याचाही सराव करीत आहे. रविवारीच्या सुटीमुळे इतर दिवसांच्या तुलनेत बाळगोपाळ व पोहोणार्‍यांच्या गर्दीत वाढ झाली होती.

पर्यटक व भाविकांची गर्दी-
गोदेला पाणी सोडल्यामुळे पर्यटक व भाविकांची पावले पुन्हा गोदाघाटाकडे वळत आहे. यापूर्वी रामकुंड व नदीपात्रात पाणी नसल्याने धार्मिक विधीकरिता या ठिकाणी येणार्‍या भाविकांची मोठी निराशा झाली होती. मात्र आता पुन्हा गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सायंकाळी गांधी तलावात बोटीत फेरफटका मारण्याचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!