२८१ अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप

बालक वजने, कुटुंब सर्वेक्षण, कुपोषण, गरोदर, स्तनदा माता माहिती एका क्लिकवर

0
येवला | प्रतिनिधी
अंगणवाडी सेविंकाना मोबाईल टॅब देऊन सर्व माहिती मोबाईलद्वारे संकलीत करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम जिल्ह्यात सुरु झाला असून १ मे २०१९ पासून जिल्ह्यातील सर्व अंंगणवाड्यांच्या कामकाजाची नोंद एका अ‍‍ॅप्लीकेशन सॉफ्टवेरद्वारे सुरु होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील २८१ अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी अन्सार शेख, भगवान गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे डॉ. गिते यांनी हाती घेतल्यापासून नाशिक जिल्ह्याचा अनेक उपक्रमात पथदर्शी प्रकल्प म्हणून सहभाग नोंदवून देशात आदर्शवत जिल्हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून राज्यातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिक जिल्हा महिला व बालविकास विभागातील सर्व अंगणवाड्या ऑनलाईन पध्दतीने जोडण्यासाठी व अंगणवाड्यांचे कामकाज गतीमान होण्यासाठी येवला तालुक्यातील २८१ अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने महिला व बाल कल्याण विभागाचे पोषण अभियान योजने अंतर्गत मोबाईल देण्यात आले असून त्यामध्ये एक कॉमन अ‍‍ॅप विकसित केलेले असून त्यामध्ये अंगणवाडी केंद्रांशी निगडीत सर्व रजिष्टरचा समावेश करण्यात आलेला आहे.
त्यामध्ये दैनंदिन अंगणवाडीवरील माहिती उदा. बालकांची वजने कुटुंब सर्वेक्षण कुपोषणाची स्थिती, गरोदर स्तनदा माता व किशोरवयीन मुलींची माहिती याचा समावेश आहे. यामध्ये माहिती कशी भरवयाची यासाठी नुकतेच प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या मार्फत येवला शहरातील जनता विद्यालयात हे प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षणात गटविकास अधिकारी अन्सार शेख, बाल विकास प्रकल्प अधिकारी बी. के. गर्जे यांचे हस्ते अगणवाडी सेविकांना या अद्ययावत मोबाईलचे वाटप करण्यात आले .मोबाईलवरील या सॉफ्टवेअर मुळे अंंगणवाडी सेविकंांचा रजिष्टर भरण्याचा ताण कमी होणार आहे. अंगणवाड्या पेपरलेस होण्यास मदत होणार आहे. अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ज्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क आहे, त्यांच कंपनीचे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी सहा महिन्याचा नेटचा डाटा पॅक सह निधी उपलब्ध असून सुरवतीला सिमकार्ड व तीन महिन्याचे नेट पॅक टाकून देण्यात आलेला आहे. त्याच बरोबर मेमरी कार्ड सह अद्यावत मोबाईल पुरवण्यात आलेले आहेत.
गटविकास अधिकारी शेख व बाल विकास प्रकल्प अधिकारी गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अहिरराव, निकुंभ, गवळी, शिंदे, आमले, मंदा पगारे, संगीता पगारे, सुनिता खापरे, आशा दराडे या प्रशिक्षकांमार्फत तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम झाला.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी गट समन्वक मारुती खैरनार व कार्यालयीन कर्मचारी पगार, पोलगीर यांनी परिश्रम घेतले. जनता महाविद्यालय प्राचार्य डॉ. भाउसाहेब गमे, नानासाहेब पटाईत यांनीे या प्रशिक्षण शिबीरास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*