‘राजधानी’च्या वेळेत उद्यापासून बदल

0
नाशिकरोड | प्रतिनिधी
मुंबईहून दिल्लीला जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसच्या वेळेमध्ये उद्यापासून (दि. १७) बदल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. वेळापत्रकात बदल करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या बदलामुळे गाडीचा रनिंग टाईम कमी झाला असून दिल्लीला ती अर्धा तास आधी पोहोचेल.ही एक्सप्रेस गाडी आठवड्यातून दोन वेळा धावते.
मुंबईहून दिल्लीला ही गाडी बुधवारी आणि शनिवारी धावते. नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी मुंबईहून दुपारी २.५० एवजी सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल. नाशिकरोडला सायंकाळी ६.४२ येऊन ६.४५ वाजता दिल्लीच्या दिशेने निघेल. पूर्वी ही वेळ ५.५८ वाजता होती. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकात ही गाडी गुरुवारी आणि रविवारी १०.२० एवजी १०.०५ वाजता पोहोचेल.
राजधानी एक्सप्रेसने नाशिक ते दिल्ली प्रवासासाठी पूर्वी साडेसोळा तास लागत असे आता सोळा तासात ती दिल्लीला पोहोचेल. राजधानी एक्सप्रेस दिल्लीहून मुंबईसाठी गुरुवारी आणि रविवारी दुपारी सव्वाचार वाजता सुटत असे. आता सायंकाळी सव्वापाच वाजता सुटेल. नाशिकरोडला शुक्रवारी आणि सोमवारी ती ८.३० वाजता येऊन ८.३२ वाजता मुंबईला निघेल. मुंबईला ११.५५ ऐवजी ११.५० वाजता पोहोचेल.

LEAVE A REPLY

*