वीज कोसळल्याने झाडाने घेतला पेट

0

नवीन नाशिक |  प्रतिनिधी

सावता नगर येथील हनुमान चौकात वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतल्याची घटना घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या कडकटासह पाऊस सुरू झाला यादरम्यान मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी बाहेर येऊन पाहिले तर क्षणार्धात एका नारळाच्या झाडाने पेट घेतला.

या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. या विजेची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने झाडाने क्षणार्धात पेट घेतला होता यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही नागरिकांनी झाडावर पाणी टाकून ते विझविले. झाडाच्या खाली काही वाहने उभी होती शिवाय शेजारी घरे होती. सुदैवाने मोठी हानी टळली.

झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला – मी घरात बसलो असतांना. खुप मोठ्याने आवाज झाला म्हणून बाहेर आलो बघतो तर वीज झाडावर कोसळली आणि झाड पेटले. – मनोज गायकवाड, रहिवाशी व प्रत्यक्षदर्शी.

 

LEAVE A REPLY

*