Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एसटीच्या साडेतीन हजार फेर्‍या रद्द; ‘करोना’मुळे १३ आगारांचे नुकसान

Share
एसटीच्या साडेतीन हजार फेर्‍या रद्द; ‘करोना’मुळे १३ आगारांचे नुकसान; 3500 rounds of ST canceled

नाशिक । प्रतिनिधी

जगात हैदोस घालणार्‍या करोना व्हायरसमुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्रवासीच नसल्याने एसटीच्या फेर्‍या रद्द कराव्या लागत असून आधीच तोट्यात चाललेले महामंडळ करोनामुळे आणखीनच तोट्यात जाणार आहे.

नाशिकमधील एसटीच्या १३ डेपोंमधून दि. १५ ते १८ मार्च या चार दिवसात तब्बल ३३०० फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातून १ लाख २७ हजार कि.मी. अंतरही रद्द झाले आहे. त्यातून १३ आगारांचे ३६ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. नाशिकमधील डेपो क्र. २ मधून सर्वात जास्त म्हणजे ११६२ फेर्‍या रद्द झाल्या आहेत. त्याखालोखाल सिन्नर आगारातून ४६६ फेर्‍या रद्द झाल्या आहेत.

दरम्यान, जोपर्यंत करोनाची साथ नियंत्रणात येत नाही तोपर्यंत महामंडळाला तोटा सहन करावा लागणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नाशिकमधील १३ आगारांच्या १३३२ फेर्‍या रद्द झाल्या. यात नाशिक-१ आगारातून १४९, नाशिक-२ (३७४), मालेगाव (६८), मनमाड (४), सटाणा (८८), नांंदगाव (१०८), इगतपुरी (६५), लासलगाव (५२), कळवण (१३०), पेठ (६), येवला (७८), पिंपळगाव (४४).

शिवशाहीच्या ५० टक्के फेर्‍या रद्द
नाशिक-पुणे शिवशाही बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. दररोज शिवशाहीच्या ७८ फेर्‍या होतात. मात्र प्रवाशांनी करोनाची धास्ती घेतल्यामुळे शिवशाही बससेवेला फटका बसला आहे. या शिवशाहीच्या निम्म्या फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढवली आहे. सोमवारी ५०, मंगळवारी ४७ तर बुधवारी अवघ्या ४० फेर्‍या झाल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!