८५४ जणांना रोजगार संधी

मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, परिसर गजबजला

0

नाशिक | प्रतिनिधी रोजगार व उद्योजकता मेळाव्यातून सुमारे साडेतीन हजार उमेदवारांपैकी ८५४ जणांची निवड झाली आहे. उमेदवारांत किती मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली हे यातून दिसून आले. मुलाखतींसाठी हजारो उमेदवार एकाच वेळी हजर झाल्याने गायकवाड सभागृहाचा परिसर गर्दीने गजबजला होता.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि युवक मित्र मंडळ मुंबईनाका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात  (दि. २८) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

मेळाव्याचे उद्घाटन उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख, नाशिक विभागीय उपसंचालक सुनील सैंदाणे, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक अजिंक्य साने, युवक मंडळाचे अध्यक्ष विनोद गाडे, संपत चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बॅाम्बे इंटलिजेन्स, व्हीआयपी, रोठे एअर इंडिया, डेटामॅटीक्स, मायलॅान, डब्लूएनएस यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी रिक्त एक हजार ३३ जागांसाठी तब्बल तीन हजार ३९१ उमेदवारांच्या यावेळी मुलाखती घेण्यात आल्या.यात ८५४ उमेदवारांना प्राथमिक रोजगाराची संधी मिळाली आहे.

त्यांना पुढील टप्प्यांसाठी बोलविण्यात येणार असून या उमेदवारांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. सर्व पदांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदविका, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि फार्मसी, बी. कॉम., बीएस्सी आदी नियमित अभ्यासक्रमाचे उमेदवार सहभागी झाले होते.

नोकरी कराल का?
यावेळी मुलाखत घेणारांनी तुम्ही ही नोकरी करणार का?  अशी उमेदवारांना विचारणा केली. तात्पुरत्या स्वरुपातील रोजगारासाठी अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यामुळे मुलाखतकारही आश्चर्यचकित झाले.

 

LEAVE A REPLY

*