Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

कळसूबाई शिखरावर स्वच्छतेसाठी उडाण फाउंडेशनचा पुढाकार

Share

सिन्नर । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखरावर नवरात्र उत्सवानिमित्त येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सिन्नर शहरातील उडाण फाउंडेशनकडून कचरा संकलनासाठी कचरा बॅग व जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले आहेत.

नवरात्रात साधारण ५० ते ६० हजार भाविक कळसूबाईच्या दर्शनासाठी येत असतात आणि यावेळी शिखरावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा इतरत्र पसरला जातो. यासाठी उडाण फाउंडेशनकडून पायथ्या पासून शिखराच्या शेवटच्या टोकापर्यंत कचरा बँग व कचरा संकलनासाठी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहे.

संकलनासाठी कचरा ब‌ॅग लावून जमा झालेला कचरा ग्रामपंचायत आवारात जमा केला जातो. नंतर त्या कचर्‍याची ग्रामपंचायत योग्य विल्हेवाट लावते. ही मोहीम सुरू झाल्यापासून कळसूबाई शिखरावर कचर्‍याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. पूर्णपणे कचर्‍याने भरलेल्या बॅग सामाजिक काम समजून जे भाविक ग्रामपंचायत आवारात जमा करतील आशा भाविकांचा फाउंडेशन गौरव करण्यात येणार आहे.

यासाठी बारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक वाबळे, फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे, शिवाजी घुगे, संदिप चौधरी, भाऊसाहेब शेळके, सत्यजीत कळवणकर, दिलीप क्षिरसागर, सार्थक शिंदे आदि कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले आहे.

कळसुबाई शिखरावर येणार्‍या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पाणी बाँटल, खाद्यपदार्थांसाठी प्लास्टीकचा वापर केला जातो. पर्यायाने हा कचरा शिखरावर पसरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य शिखरावर पसरते. गेल्या वर्षापासून बेटी बचाव, हगणदारी मुक्ती, स्वच्छता आदि विषयावर फलक लावून जनजागृती करण्यात येत असून मागील वर्षीपासून कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची मोहिम हाती घेतली आहे.
भरत शिंदे, अध्यक्ष

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!