विद्यापीठाकडून तासभर उशीराने आला पेपर…

0
नाशिकरोड | प्रतिनिधी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अपेक्षित प्रश्नपत्रिका ऑनलाईनद्वारे उशिरा मिळाल्यामुळे नाशिकरोड महिला महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेचा पेपर एक तास विलंबाने सुरु झाला.
दरम्यान, इंटरनेट रेंज मिळत नसल्यामुळे तसेच खंडीत वीजपुरवठ्यामुळे पेपर सुरु होण्याच्या वेळांवर परिणाम होत आहे.
विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या दरवर्षी जाणवत आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे परिक्षा विभाग हैराण झाले आहेत.
महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत.
काल  एफवायबीएचा कला शाखेचा मराठीचा पेपर होता. त्याची वेळ दुपारी २ ते ५ अशी वेळ होती.
नाशिकरोड महिला महाविद्यालयात प्रथम वर्ष कलाचे १५८ विद्यार्थी आहेत. विद्यापीठामध्ये फक्त या महाविद्यालयातच ‘व्यावहारिक मराठी ‘ हा विषय शिकवला जातो.
त्याची प्रश्नपत्रिका अपेक्षित असताना विद्यापीठाच्या परिक्षा विभागाने ‘साहित्यिक मराठी ‘ पेपरचा कोड इंटरनेटव्दारे पाठवला.
अपेक्षित पेपर आला नसल्याची माहिती महाविद्यालयाने विद्यापीठाला कळवली.
व्यावहारिक मराठीची प्रश्न पत्रिका येण्यास, तिची झेराक्स काढून ती विद्यार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत एक तास लागला.
त्यामुळे परिक्षा सुरु होण्यास एक तास विलंब झाला. विद्यार्थ्यांना एक तास वाढवून देण्यात आला.
कधी लोडशेडिंगमुळे तर कधी इंटरनेटची रेंज नसल्यामुळे प्रश्नपत्रिका मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियामनुसार परिक्षेचा वेळ वाढवून दिला जातो.

LEAVE A REPLY

*