स्वच्छता राखणे हीच आरोग्यम् धनसंपदा

‘देशदूत’-‘सॅव्हलॉन स्वस्थ भारत मिशन’अंतर्गत चर्चासत्रात डॉ. दीप्ती जोशी यांचे प्रतिपादन

0
नाशिक| प्रतिनिधी स्वच्छता राखताना केवळ पाणी आवश्यक नसून किटाणू नष्ट करण्यासाठी योग्य हॅण्डवॉश वापरणे गरजचे आहे. त्यातून कोणताही आजार होणार नाही, असे मत दंतरोगतज्ञ डॉ. दीप्ती जोशी यांनी व्यक्त केले.
‘सॅव्हलॉन स्वस्थ भारत मिशन-देशदूत चर्चासत्र’ सध्या नाशिकमधील विविध शाळांत सुरू असून ‘हेल्दीयर किडस्, स्ट्रॉंगर इंडिया’ निर्माण करण्याचा यामागील हेतू आहे.
‘देशदूत’ आणि ‘सॅव्हलॉन स्वस्थ भारत मिशन’अंतर्गत देवळाली कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. गुजर सुभाष हायस्कूल येथे याबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जोशी बोलत होत्या.
स्वच्छता ठेवली तर कोणताही आजार पसरण्याचा धोका फार कमी असतो. नियमित आंघोळ महत्त्वाची असून आठवड्यातून दोनदा केस धुणे गरजेचे आहे. यासह जोशी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या अनेक टिप्स दिल्या. दातांची निगा राखताना घ्यावयाच्या काळजीबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण विवेचन केले.
यावेळी ‘देशदूत टाईम्स’ व ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सांगितले की, लहान मुले भारताचे भविष्य आहेत. स्वच्छता राखली तर आपल्याला कोणतेही आजार होणार नाहीत. यासह त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपले आरोग्य अबाधित राहते, असे मुलांना समजावून सांगितले. आपण स्वतःपासून आपली व परिसराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव रतन चावला यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. शालेय परिसर व शाळा स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांना हॅण्डवॉश व सॅनेटायझर वापरण्याबाबतच्या जनजागृतीपर चित्रफिती दाखवण्यात आल्या. सॅव्हलॉनकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटण्यात आल्या. ‘हाथ धोके अपने सपनोंके पिछे पडो,’ असे म्हणत उपस्थित मुलांना त्यांनी प्रोत्साहित केले.
यावेळी ‘देशदूत’चे सातपूर व नवीन सिडकोचे कार्यालयप्रमुख पराग पुराणिक, संस्थेचे चंद्रकांत वेंगसायनी, मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया, उपमुख्याध्यापिका शीतल दोडेजा, शालेय समिती समन्वयक सिमरन चावला उपस्थित होते. सूत्रसंचालन रूपाली आवारे व स्नेहा राजकेसानी यांनी केले.
हात स्वच्छ धुण्याच्या सवयीत बदल
सॅव्हलॉन स्वस्थ भारत मिशन-‘देशदूत’ चर्चासत्र या शाळांमधील विविध सर्वसमावेशक व मनोरंजक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शालेय मुलांमध्ये हात स्वच्छ धुण्याच्या सवयीसंदर्भात बदल घडवून आणण्यासाठी तयार केलेला हा उपक्रम आहे.

 

LEAVE A REPLY

*